Vande Bharat Express : मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेसबाबत मोठी अपडेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत एक्सप्रेसची (Vande Bharat Express) मागणी ही दिवसेंदिवस वाढतच आहे. खास करूंन लांबच्या पल्ल्यासाठी आरामदायी प्रवासाच्या दृष्टीने अतिशय मस्त अशी ही रेल्वे असल्याने अनेकजण वंदे भारत मधून प्रवास करण्याला आपलं प्राधान्य देत आहेत. त्यामुळे या एकूण सर्व पार्श्वभूमीवर देशाच्या कानाकोपऱ्यात सातत्याने नवनवीन वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात येत आहेत. आपल्या महाराष्ट्रालाही आत्तापर्यंत ३-४ वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्या असून आता मुंबई-जालना वंदे भारत ट्रेनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. त्यानुसार येत्या वर्षाअखेर हि वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होऊ शकते. यामुळे देशाची आर्थिक राजधानी मराठवाड्याला जोडण्यात येईल आणि मुंबई ते जालना प्रवास आणखी सुखकर होण्यास मदत होईल.

मुंबई ते जालना वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) सुरु करण्यासाठी सर्वात महत्वाचे ह्या मार्गाचे विदयुतीकरण पुर्ण होणे आवश्यक होते. त्यानंतरच वंदे भारत ह्या मार्गांवरून सुरु होऊ शकणार होती. पण आता ह्या जालनापासून ते मुंबई पर्यंत रेल्वेमार्गाचे विदयुतीकरण पुर्ण झालेले असून ह्या संपूर्ण रेल्वे मार्गाचे सक्षमीकरण करण्यात येत आहे. जालना – मनमाड या १७४ किमी मार्गावर रेल्वेची गती ताशी १३० किमीपर्यंत वाढवण्यास मार्च २०२३ मध्ये मान्यता मिळाली आहे. तसेच या मार्गातील सिग्नल यंत्रणा, रेल्वे मार्गाचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे आकर्षक आणि वेगवान अशी वैशिष्ट्ये असलेली वंदे भारत या मार्गावर चालवण्यास सक्षम आहे. त्यामुळे वर्षाखेरीस मुंबई – जालना वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविण्यात येण्याची शक्यता आहे.

वंदे भारत १६ डब्यांची असण्याची शक्यता  : Vande Bharat Express

याआधीच महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात आलेली आहे. मध्य रेल्वेवरून मुंबई – सोलापूर, मुंबई – शिर्डी, मुंबई – मडगाव आणि पश्चिम रेल्वेवरून मुंबई – गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. आता मुंबई ते जालना ह्या मार्गांवर वंदे भारत (Vande Bharat Express) सुरु होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ही वंदे भारत १६ डब्यांची असण्याची शक्यता आहे. सध्या तरी रेल्वे मंडळाने यासंदर्भातील कोणतेही वेळापत्रक अद्याप जाहीर केलेले नाही.