Vande Bharat Express : केंद्राची महत्वाकांक्षी योजना! जम्मू- काश्मीरसह या भागात सुरु होणार वंदे भारत एक्सप्रेस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) मधून प्रवास करण्यासाठी वाढती मागणी आणि भारतीय रेल्वे आपली प्रवासी सेवा सुधारण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस भारताच्या वेगवेगळ्या मार्गांवर चालवल्या जात आहेत. भारतीय रेल्वे चालू आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत म्हणजेच मार्च 2024 पर्यंत भारतात 75 वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचे नियोजन करत आहे. याच नियोजनानुसार भारतीय रेल्वे नॉर्थ ईस्ट आणि जम्मू व काश्मीरसाठी एकूण 3 वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याचा विचार करत आहे.

श्रीनगरपर्यंतचा प्रवास वंदे भारत एक्सप्रेसने : Vande Bharat Express

दिल्ली ते कटरा दरम्यान सध्या वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यात येते. मात्र काश्मीरमध्ये अद्याप वंदे भारत एक्सप्रेस पोहचलेली नाही त्यामुळे काश्मीर मधील श्रीनगरपर्यंत वंदे भारत सुरु करण्याचा भारतीय रेल्वेचा विचार आहे. जम्मू-श्रीनगर मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाईल. या आर्थिक वर्षात जम्मू-श्रीनगर रेल्वे मार्गाचे काम पुर्ण होण्याची अपेक्षा आहे. काश्मीर प्रदेशासाठी ट्रेनची रचना एका अनोख्या पद्धतीने करण्यात आली आहे जेणेकरून त्या तापमान आणि उंचीवर सुरळीतपणे रेल्वेगाड्या धावतील. त्यामुळे लवकरच दिल्ली ते श्रीनगर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरु होईल.

त्रिपुरा व मेघालयासाठी वंदे भारत एक्सप्रेस :

वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) देशातील सर्वात वेगवान ट्रेन आहे, ज्याचा सर्वाधिक वेग ताशी 180 किमी आहे, तर कार्यरत वेग 130 किमी प्रतितास आहे. नव्या युगातील या ट्रेनमधील प्रवासामुळे प्रवासाचा कालावधी २५ टक्क्यांनी कमी होऊन ४५ टक्के झाला आहे.रेल्वेने नॉर्थ ईस्ट साठी आणखी दोन सेमी-हाय स्पीड ट्रेनची योजना आखली आहे. यातील एक ट्रेन त्रिपुरासाठी तर दुसरी मेघालयसाठी असेल. या दोन्ही गाड्या पुढील आर्थिक वर्षात दाखल होण्याची शक्यता आहे., वंदे भारत सुरु करण्याची तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही परंतु दोन्ही क्षेत्रांतील रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाल्यावर ते सुरू केले जाईल अशी अपेक्षा आहे.