हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रचंड यशानंतर भारतीय रेल्वे आता लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वंदे भारत एक्सप्रेसला स्लीपर(Vande Bharat Sleeper) प्रकारात ICF ( Integral coach factory ) येथे विकसित करण्यात आली आहे. खास करून आपण लांबच्या प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य देत असतो, त्यामुळे नागरिकांचा प्रवास आणखी सुखकर व्हावा यासाठी भारतीय रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेसचे स्लीपर व्हर्जन तयार केले आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे देशातीलपहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन महाराष्ट्रातून धावणार आहे.
मुंबई ते दिल्ली वंदे भारत स्लीपर ट्रेन – Vande Bharat Sleeper
पहिली वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस ही मुंबई ते दिल्ली ह्या रेल्वे मार्गांवर चालवली जाण्याची दाट शक्यता आहे. कारण हा रेल्वे मार्ग सर्वात व्यस्त प्रवासी रेल्वे मार्ग असून या दोन्ही महत्वाच्या शहरांदरम्यान प्रवास करण्याऱ्या प्रवाश्यांची संख्या देखील अधिक आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही मोठी आनंदाची गोष्ट आहे.
भारत स्लीपर एक्सप्रेसचा ताशी वेग हा 160 km/ hr इतका:
वंदे भारत स्लीपर मध्ये आधुनिक पद्धतीने तयार केलीली व आरामदायी स्लीपर बर्थ तयार करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबरीने वंदे भारत एक्सप्रेसमध्ये असलेल्या सर्व सुविधा वंदे भारत स्लीपर मध्ये (Vande Bharat Sleeper) पण प्रवाश्यांना मिळणार आहेत. तसेच वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसचा ताशी वेग हा 160 km/ hr इतका असणार आहे त्यामुळे लांबच्या पल्ल्याच्या प्रवासासाठीचा तुमच्या वेळ देखील वाचणार आहे. यासाठी भारतीय रेल्वे ज्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस चे स्लीपर व्हर्जन चालवणार आहे. अश्या रेल्वे मार्गाचे सक्षमीकरण करण्याचे काम सध्या भारतीय रेल्वे विभागाने हाती घेतलेले दिसत आहे.
काम पुर्ण झाल्यावरच वंदे भारत स्लीपर रेल्वे मार्गांवर :
अभियांत्रिकी विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, भिंत आणि ट्रॅक मजबूत करण्याव्यतिरिक्त, ट्रॅक जितका सरळ होईल तितका वेग वाढणार आहे. या प्रकल्पातील पश्चिम रेल्वे परिसरातील 107 कर्व्ह ट्रॅक सरळ करण्यात आले आहेत. उर्वरित 27 वक्र ट्रॅक देखील लवकरच सरळ केले जातील. ताशी 160 किमी वेगासाठी, 60 किलो 90 यूटीएस रेलची आवश्यकता असते, तर भारतीय रेल्वेमध्ये बहुतेक ठिकाणी 52 किलो 90 यूटीएस रेल ट्रॅक स्थापित आहेत. यामुळे ताशी 160 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ला सुरू करण्यासाठी ट्रॅक बदलावे लागणार आहेत.हे काम पुर्ण झाल्यावरच ह्या मार्गांवर वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस चालू होणार आहे.