पावसाचा आनंद लुटा मनसोक्त! महाराष्ट्र शासनाकडून ‘याठिकाणी’ वर्षा महोत्सवाचे आयोजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाऊस म्हणलं की, आपल्या डोळ्यासमोर पहिलं उभ राहत ते म्हणजे निसर्गरम्य असं वातावरण. तसेच, कोसळणारे धबधबे, सासलेल्या डब्यात सोडलेली होडी, फुला पानांवर साचलेले दवबिंदू आणि गरमागरम चहासोबत मिळालेली कांदा भजी. अशा कित्येक गोष्टी आपल्याला पावसाच्या नावावर आठवतात. त्यामुळेच अशा बरसणाऱ्या पावसाची मजा घेण्यासाठी 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्र शासनाकडून भंडारदरा आणि आंबोली येथे वर्षा महोत्सव कार्यक्रम (Varsha Mahotsav Program) आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला सर्व पाऊस प्रेमींना सहभागी होता येणार आहे.

वर्षा महोत्सव कार्यक्रमाची माहिती पर्यटन विभागाचे संचालक डॉ.श्री.बी.एन.पाटील यांनी दिली आहे. श्रावणात पावसाचे दमदार आगमन झाल्यामुळे शेतकरी राजा देखील सुखावला आहे. तसेच अनेक गावागावात पेरणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. त्यामुळेच या श्रावण पावसाचा आनंद घेण्यासाठी 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पासून वर्षा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात खाद्य परंपरा, वैभवशाली परंपरा, महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा, लोकगीत, आदिवासी, शेतकरी बांधवांच्या दुर्लक्षित होत आलेल्या परंपरा सादर करण्यात येणार आहेत. यामागे या सर्व गोष्टींचे जतन व्हावे असा आहे तो शासनाचा आहे.

त्याचबरोबर भंडारा ते आंबोली पर्यटनाला चालना देण्यासाठी देखील हा कार्यक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला पावसाच्या प्रत्येक थेंबावर प्रेम करणाऱ्या पर्यटकांनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन महाराष्ट्र शासनाने केले आहे. महाराष्ट्रात श्रावण पावसाला सुरुवात झाली की शेतकरी बांधव पेरणीच्या तयारीला लागतो. तसेच, शेतीतील बरीच कामे या काळात निघतात. यावेळी लोककला सादर करत पेरणीची गाणी म्हणत शेतकरी बांधव अगदी आनंदात आपले काम करत असतो. मात्र अनेकांना या लोकपरंपराच माहित नसतात. त्यामुळे अशा कार्यक्रमांमधून याबाबतची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हेतू शासनाचा आहे.