मी ‘राजमार्गा’वर होतो आणि ‘राजमार्गा’वरच राहणार ; वसंत मोरे यांनी केली भूमिका स्पष्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेनंतर चांगलेच राजकारण तापले. ठाकरेंवर गुन्हाही दाखल करण्यात आला.त्यांच्या सभेनंतर पुण्याचे माजी मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे तिरुपती बालाजीला गेले होते. आज पुण्यात आल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्प्ष्टपणे मांडली. आमची जी लढाई चालली आहे. त्या लढाईत सेनापती नाही. सेनापती लढाई कोणी हरत नाही. मी ‘राजमार्गा’वर होतो आणि ‘राजमार्गा’वरच राहणार आहे. माझ्या व्हॉटसअ‍ॅप स्टेटसचाही अनेकांनी चुकीचा अर्थ काढला असल्याचे मोरे यांनी म्हटले.

राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानंतर मनसे सैनिकांकडून भोंगा आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये सहभागी न होता मनसे नेते वसंत मोरे हे दिवसांसाठी बाहेरगावी गेले होते. त्यामुळे त्यांच्या नाराजी बाबतच्याही चर्चा सुरु होत्या. दरम्यान आज मोरे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मी नाराज नाही, केवळ शांत आहे. मागच्या काही महिन्यांपासून धावपळ झाली. माझा प्रभाग उपनगरामध्ये मोडतो, याठिकाणी भोंग्यांच्या प्रश्नी सर्व सुरळीत सुरू असल्याचे मोरे यांनी सांगितले.

दरवर्षी मी बालाजीला जात असतो. अक्षय्य तृतीयेच्या दरम्यानच जात असतो. सतरा-अठरा वर्ष झाली मी जातो. मागील दोन वर्ष कोरोनामुळे जाता आले नाही. मार्च-एप्रिलनंतर मी निवडून येईल आणि बालाजीला जाईन म्हणून जवळपास दीड महिने आधीच रिझर्वेशन केले होते. ठाण्याच्या सभेला राज ठाकरेंनी स्वत: बोलावल्यामुळे नाही म्हणता आले नाही. या दरम्यान मनसे नेते संपर्कात होते त्यांना मी सांगितले होते कि मी नाराज नाही, केवळ शांत आहे, अशी माहिती मोरे यांनी दिली.