वर्धा : हॅलो महाराष्ट्र – सध्या एका भाजी विक्रेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये हा भाजी विक्रेता चक्क गटाराच्या घाण पाण्यात भाजी धुवत (vegetable vendor washed vegetables on drainage water) आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. हा किळसवाणा प्रकार वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट या ठिकाणी घडला आहे. याप्रकरणी आता भाजी विक्रेत्यावर (vegetable vendor washed vegetables on drainage water) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हिंगणघाट नगरपालिकेचे प्रशासनक सतीश मासाळ यांनी पोलीस तक्रार केल्यानंतर पोलिसांनी संबंधित भाजी विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल केला. हिंगणघाट पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करुन घेतला आहे.
तुम्ही खात असलेली भाजी गटारात धुतलेली तर नाही ना? किळसवाणा प्रकार आला समोर pic.twitter.com/Af86hBRkr6
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) July 16, 2022
काय आहे व्हिडिओमध्ये ?
सदर भाजीविक्रेता हा हिंगणघाट शहराच्या मनसे चौकातील असलेल्या नालीतून आपली भाजी धूत (vegetable vendor washed vegetables on drainage water) असल्याच कॅमेऱ्यात एका नागरिकाने कैद करून सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल केला होता. नालीत भाजी धुणारा भाजीविक्रेता हिंगणघाट शहराच्या डांगरी वार्डातील रहिवासी आहे. शुभम टामटे असे या भाजी विक्रेत्याचे नाव आहे.
भाजीविक्रेत्याने केलेला (vegetable vendor washed vegetables on drainage water) हा प्रकार हिंगणघाट शहरातील एका सूज्ञ नागरिकांने कॅमेऱ्यात कैद करून उघडकीस आणला. भाजी विक्रेत्याच्या या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेत त्याच्यावर भादवीच्या कलम 273 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान
आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे
नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार