प्रवेशबंदी असतानाही गावात आल्यामुळे भाजप खासदाराच्या ताफ्यातील वाहनांची तोडफोड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला तापला आहे. या मुद्द्याला धरून अनेक गावात तर राजकिय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मात्र तरी देखील भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर नांदेडच्या कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात कार्यकर्त्यांसोबत गेले होते. ज्यामुळे गावकऱ्यांनी आक्रमकची भूमिका घेत प्रताप पाटील चिखलीकर यांच्या ताफ्यातील वाहनांची तोडफोड केली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र तीन वाहनांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या, अशी मागणी राज्यातील मराठा बांधवांनी केली आहे. यामुळे राज्यातील वातावरण ही तापले आहे. परंतु अशा परिस्थितीत देखील सरकारकडून आरक्षणाबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे, पहिले आरक्षण द्या आणि मग गावात या अशी ठाम भूमिका मराठा बांधवांनी घेतली आहे. अनेक गावात पुढारी नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. सर्व राजकीय नेत्यांना गाव बंदी असताना देखील शिवसेनेचे प्रताप पाटील चिखलीकर अंबुलगा गावात आपल्या कार्यकर्त्यांसोबत गेले होते. यावेळेस माघारी परतताना त्यांच्या ताफ्याच्या गाड्या फोडण्यात आल्या. तसेच, गावकरी आणि चिखलीकर यांच्यात वाद झाला. शेवटी पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप घेत वाद शांत केला. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

https://www.facebook.com/100003988991633/posts/pfbid02ig4bZhizMQZM47qnomcBeuUWfKQxEb8TFefJ1S2M7oGSfEZT2JCit8RoMCxPoViZl/?app=fbl

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी राज्यातील अनेक गावांमध्ये साखळी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनातला गावकऱ्यांकडून देखील तितकाच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला जात आहे. सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यांना मराठा बांधवांकडून पूर्ण पाठिंबा देण्यात येत आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने शिंदे समितीला अहवाल सादर करण्यासाठी 24 डिसेंबपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता याबाबत जरांगे पाटील काय भूमिका घेतली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.