धैर्यशील मानेंच्या विजयाचा वाळवा तालुक्यात जल्लोष

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे 

संपुर्ण राज्याचे लक्ष लागुन राहिलेल्या हातकणंगले लोकसभा मतदार संघात महायुतीचे तरूण, तडफदार उमेदवार धैर्यशील माने यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस व राष्ट्रवादी महाआघाडीचे उमदेवार राजू शेट्टी यांचा १ लाखांच्या मताधिक्क्यानी पराभव केला.

महायुतीच्या विजयानंतर उमेदवार धैर्यशील माने व ना.सदाभाऊ खोत यांना कार्यकर्त्यांनी खांदयावर उचलून घेत गुलालाची उधळण केली. इस्लामपूरसह वाळवा तालुक्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी विजयी रॅली काढत फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केली.

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी गतवर्षी सारखी लोकसभा निवडणुक प्रतिष्ठेची बनविली आहे. त्यांनी मतदारसंघातील सर्व गावात स्वाभिमानी, काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार खा.राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ झंझावती दौरा केला आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय (कवाडे गट), शेतकरी कामगार पक्ष, आप अशी मोट बांधुन प्रचार यंत्रणा राबली. तर भाजप, शिवसेना, आरपीआय, रयत क्रांती संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ ना.सदाभाऊ खोत, आ. शिवाजीराव नाईक, कै.वनश्री नानासाहेब महाडिक, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, राहुल महाडिक, गौरव नायकवडी यांनी रान उठवले होते. त्यामुळे इस्लामपूर मतदारसंघात चुरस निर्माण झाली होती. इस्लामपूर मतदारसंघात खा.राजू शेट्टी यांना 16 हजारांचे मताधिक्क्य मिळाले. परंतू इचलकरंजी, शिरोळ, हातकणंगले मतदारसंघात मात्र धनुष्यबाणाने चढाई केली. त्यामुळे लाखापेक्षा जास्त मतांनी खा.राजू शेट्टी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. धैर्यशील माने यांचा विजय झाल्यानंतर इस्लामपूर शहरात शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

Leave a Comment