पुणे प्रतिनिधी | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना निवडणुकीत पराभूत करण्याचा चंगच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बांधला आहे. याच निर्धारातून काँग्रेस आघाडीने मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अद्याप देखील राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून कोथरूडचा उमेदवार जाहीर झाला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस मनसेला कोथरूडच्या एकाच जागेवर पाठिंबा देणार असे राजकीय जाणकारांनी देखील म्हणले आहे.
विरोधी पक्षाकडून एकच उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात असावा जो सर्वसमावेशक उमेदवार म्हणून मतदारांमध्ये विरोधी पक्षाने मनसेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच किशोर शिंदे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे दोन सभा देखील घेणार असल्याची माहिती समोर येते आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची विधानसभेची वाट बिकट होणार हे मात्र निश्चित. मात्र चंद्रकांत पाटील या निवडणुकीत कमी अधिक फरकाने जिंकून येतील असा अंदाज देखील राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.