युती २८८ नव्हे २८७ जागीच : भाजपच्या या उमेदवारा विरोधात शिवसेनेने दिला उमेदवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | भाजप आणि शिवसेनेत टोकाचे मतभेद असताना देखील शिवसेना भाजप युती झाली. युती झाल्यानंतर देखील शिवसेनेचे ज्या कुटुंबा सोबत हाड वैर आहे. अशा राणे कुटुंबातील उमेदवाराच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार दिला आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात पदाधिकारी असणाऱ्या सतीश सावंत यांनाच शिवसेनेने पक्षात घेत नितेश राणे यांच्या विरोधात निवडणुकीला उतरवले आहे.

सतीश सांवत हे नारायण राणे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जात होते. नारायण राणे यांच्या शिवसेना हकालपट्टी पासून शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात विळ्या भोपळ्याचे वैर पेटले आहे. त्या वैराचा एक भाग म्हणून नारायण राणे यांच्या मुलाच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार उभा केला आहे. भाजपने देखील यावर अद्याप आक्षेप नोंदवला नाही. त्यामुळे कणकवली मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

कणकवली मतदारसंघातून नितेश राणे २०१४ सालची विधानसभा काँग्रेसच्या चिन्हांवर लढवली होती. काँग्रेसच्या नेत्यांसोबत मतभेद झाल्यानेच नारायण राणे यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपमध्ये त्यांना घेण्यास शिवसेनेचा विरोध असल्याने भाजपने देखील नारायण राणे यांना वेटिंगवर ठेवले. मात्र त्या दरम्यान त्यांनी महराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली. त्यांनी तो पक्ष आता भाजपमध्ये विलीन केला आहे.