हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत पुण्यातील पुरंदर येथे एक कार्यक्रम पार पडला. यावेळी शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. “50 वर्ष शरद पवारांनी या पुरंदरला काही दिले नाही. पाणी दिले म्हणालेत मग काय उपकार केले काय? मात्र आम्ही दिले ते तरी कुणाच्या तोंडून घास काढून घेऊ नका, तुम्हाला देव सुद्धा माफ करणार नाही, असे म्हणत शिवतारेंनी पवारांवर निशाणा साधला.
पुरंदर येथे कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांचा शिवतारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिवतारे यांनी संजय राऊतांवरही टीका केली. संजय राऊत यांनी केलेल्या घोटाळ्याचा फटका मला बसला असल्याचे त्यांनी म्हंटले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर शिवतारे यांचे कौतुक केले. भाईंच्या रूपाने देव मिळाला. नाहीतर पुढचे अडीच वर्ष काय झाले असते माहीत नाही. महाविकास आघाडीचे सरकार नतद्रष्ट होते. त्यांनी 3 वर्षात जो अन्याय केला, भाईंनी तो 30 दिवसांत मिटवला, असे शिवतारे म्हणाले.
शिंदेंनी आमदारांना नाहीतर तर आमदारांनी शिंदेंना नेले होते – शिवतारे
एकनाथ शिंदे गटाने केलेल्या बंडाबाबत शिवतारे यांनी महत्वाचे विधान केले. यावेळी ते म्हणाले की, आमच्या आमदारांना सर्व ठिकाणी अपशद्ब बोलले जातात. एकनाथ शिंदेंनी आमदारांना नाहीतर तर आमदारांनी एकनाथ शिंदेंना नेले होते. मी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांना सांगितले होते कि काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडा, मात्र काहीही झाले नाही, असे शिवतारे यांनी म्हंटले.