विजयसिंह म्हणातात…माढ्यासह बारामती आणि मावळमध्ये राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागणार

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अकलूज प्रतिनिधी |माढा मतदारसंघाचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या मूळ गावी मतदानाचा हक्क बजावला. अकलूज येथे मतदान केल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत एवढे दिवस पाळलेले मौन अखेर सोडले आहे.

माढा मतदारसंघातून तर राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत होणारच आहे. त्याच बरोबर बारामती  आणि मावळ मधून देखील राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागणार आहे असे विजयसिंह मोहिते पाटील म्हणाले आहेत. त्याच प्रमाणे पवारांच्या टीकेला काय उत्तर द्यायचे त्यांना जनताच उत्तर देईल असे विजयसिंह मोहिते पाटील म्हणाले आहेत.

नातेपुते येथील सभेत शरद पवार यांनी मोहिते पाटील घराण्यावर टीका केली होती. त्याचे चोख उत्तर देखील विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी दिले होते. मात्र विजयसिंह नेहमीच पवारांवर टीका करायचे टाळत होते. परंतु आज अखेर त्यांनी मौन सोडले आहे.