हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सध्या भाजपसह महा विकास आघाडीकडून केली जात आहे. या निवडणुकीमुळे राज्यातील वातावरणही तापले आहे. अशात कोरोनाचा प्रसार वाढू लागला असल्यामुळे राज्यसभेच्या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठे विधान केले आहे. ” जर अशाच प्रकारे कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली तर निवडणुकाही पुढे ढकलाव्या लागतील,” असे वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे.
मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सध्या पुढचे आठ ते दहा दिवस म्हत्वाचाही आहेत. अशा परिस्थितीत जर कोरोना रुग्ण संख्या वाढल्यास आपल्याला तत्काळ निवडणूक पुढे ढकलाव्या लागतील. यासाठी आम्ही वेळ पडली तर निवडणूक आयोगालाही विनंती करावी लागेल, असे वडेट्टीवार यांनी म्हंटले.
दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. या परिस्थितीला सामोरे जावे लागेल, निर्बंधाची आवश्यकताच पडू नये यासाठी लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. शाळा, महाविद्यालये सुरू होतात, पावसाला सुरुवात होईन म्हणून संसर्ग वाढू नये याची काळजी घेणारे नियम करावे लागू नये. या काळात कोरोना कसा कमी होईल यासाठी प्रयत्न करावे. मात्र, कोरोनामध्ये वाढ झाली तर राज्य सरकार यावर निर्णय घेईल, असे वडेट्टीवार यांनी म्हंटले.