मुंबई प्रतिनिधी |राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून गणल्या जाणऱ्या पश्चिम महाराष्ट्रात भाजपने लोकसभा निवडणुकीत मोठी मुसंडी मारत राष्ट्रवादीची दैना केली. शिवसेनेला पुन्हा युतीत घेवून भाजपने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसवर चांगलीच मात दिली. याच दरम्यान माढ्यात शरद पवारांचा बालेकिल्ला पाढण्यासाठी अकलूजच्या मोहिते पाटलांनी मोठी भूमिका बजावली. याचीच पोच पावती म्हणून आता मंत्री मंडळ विस्तारात विजयसिंह मोहिते पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद दिले जाणर आहे.
विजयसिंह मोहिते पाटील हे जुने जाणतेनेते म्हणून संपूर्ण राज्याला परिचित आहेत. त्यांच्या अनुभवाचा राज्य चालवण्यासाठी फायदा करून घेण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्याच प्रमाणे मोहिते पाटील घराण्याचे पुनर्वसन देखील निवडणुकीच्या आधीच केले तर त्याचा फायदा येत्या विधानसभेला होऊ शकतो. कारण सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटील घराण्याचा करिष्मा पुन्हा एकदा संचारू लागला आहे. त्यामुळे त्यांना खुश ठेवण्याचे काम मुख्यमंत्री सध्या करता आहेत.
विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मंत्री मंडळात समावेश करण्याच्या चर्चेला देखील उधान आले होते. मात्र राजकीय दृष्ट्या पितृछायेतच विस्तारलेले रणजितसिंह मोहिते पाटलांचे कतृत्व देवेंद्र फडणवीसांना भावले नाही. त्यामुळे त्यांना मंत्री मंडळात समाविष्ट नकरता त्यांचे वडील विजयसिंह मोहिते पाटील यांना फडणवीसांनी मंत्री मंडळात स्थान देण्याचे निश्चित केले आहे. मंत्री मंडळ विस्ताराची तारीख जाहीर केली नसली तरी येत्या काही दिवसातच मंत्री मंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.