कंगना बोलली ते खरंच, माझं तिला समर्थन; मराठी अभिनेत्याचा कंगनाला पाठिंबा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 1947 साली देशाला मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक होती, खर स्वातंत्र्य तर 2014 ला मिळालं अस वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत वर सर्वत्र टीका होत असताना मराठी अभिनेते विक्रम गोखले यांनी मात्र कंगनाच्या विधानाचे समर्थन केले आहे. त्यामुळे विक्रम गोखलेही वादात अडकण्याची शक्यता आहे.

कंगना जे म्हणाली ते खरं आहे. मी समर्थन करतो तिच्या वक्तव्याचे. कोणाच्या मदतीने हे स्वातंत्र्य मिळालं आहे? आपले स्वातंत्र्यवीर जेव्हा फाशीवर जात होते. तेव्हा त्यांना फाशीपासून कोणी वाचवलं नाही. हे चुकीचं आहे, असं ते म्हणाले. मतपेट्यांचं राजकारण करणाऱ्यांमुळेच हिंदू, मुस्लिम, ब्राह्मण, दलित असा वाद होत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आल्यास फार बरं होईल .शिवसेना-भाजप युतीबाबत मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. तेव्हा चूक झाली असं उत्तर फडणवीसांनी दिलं होतं. दोन्ही पक्षांनी अडिच अडिच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं? असा सवालही त्यांनी केला