हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “हिंमत असेल तर शिंदे गटाने सनदशीर मार्गाने कमवावे आणि त्यावर मालकी सांगावी. शिवसेनेच्या मालकीवर ताबा मिळवायचा आणि आयत्या बिळात नागोबा व्हायचं. आता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले बाप देखील बदलले. काल-परवा पर्यंत बाळासाहेब ठाकरे त्यांचे पिता होते. आता अमित शाह त्यांना वडिलांसारखे वाटायला लागले आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली.
काल भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुणे व कोल्हापुरात उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यांच्या टीकेचा आज खासदार विनायक राऊत यांनी समाचार घेतला असून त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, बाप बदलायाचा, नाव बदलायचं, झेंडा बदलायचा, ताटातील हिसकावून घ्यायचे, अशी बदमाश लोकांची औलाद आहे.
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आज संघटनात्मक बांधणीसाठी ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक सेनाभवनात आयोजित करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले असल्यामुळे उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे.