ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन

0
73
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६७ व्या वर्षी दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे कौटुंबिक सूत्रांनी सांगितले. दूरदर्शन आणि एनडीटीव्ही सारख्या वृत्तवाहिन्यांसाठी काम केलेले दुआ हे हिंदी पत्रकारितेतील एक प्रसिद्ध चेहरा होते.

https://www.instagram.com/p/CXD4ZXLp5pd/?utm_medium=copy_link

दुआ यांना काही दिवसांपूर्वी यकृताच्या संसर्गामुळे परमानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या ५ दिवसांपासून ते अपोलो हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल होते. दुआ यांच्या मागे दोन मुली आहेत. दुआ यांच्या पत्नीचा या वर्षी जूनमध्ये कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला होता. दुआ यांनीही कोरोनाशी लढा दिला होता आणि तेव्हापासून त्याचे शरीर अधिकाधिक कमकुवत होत गेले. दुआ यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी १२ वाजता लोधी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दुआ यांची मुलगी अभिनेत्री मल्लिकाने इंस्टाग्रामवर लिहिले, “ते (वडील विनोद दुआ) आता आमच्या आई आणि त्यांची लाडकी पत्नी चिन्नासोबत स्वर्गात आहेत आणि ते गाणे, स्वयंपाक करणे आणि एकत्र प्रवास करणे सुरू ठेवतील.” त्यांची मुलगी बकुल दुआ आहे. त्या मानसशास्त्रज्ञ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here