हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पावसाळ्यामध्ये बऱ्याच नद्यांना -नाल्यांना पूर येतो. या पुराची पातळी वाढल्यास जनजीवन नष्ट होण्याची शक्यता असते. पावसाळ्यामध्ये नदी नाल्यांना पूर आल्यावर घरातून बाहेर निघणं मुश्किल होऊन जातं. कोणीही घराबाहेर पडू नका असे आवाहन प्रशासन करत असत. परंतु पाण्यासोबत मस्ती करणाऱ्या निष्काळजी लोकांची कमी या जगात नाही. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये प्रवाशांनी खचाखच भरलेली एक चारचाकी गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता कि एका पुलावरून प्रचंड पाणी वाहत आहे. अशातच एक जीप त्या ठिकाणी पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करते. ही जीप प्रवाशांनी खचाखच भरली असून जीपच्या छतावर काहीजण बसलेले तर काहीजण जीपच्या मागच्या साईडने उभे असल्याचं दिसत आहे. ही गाडी पाण्यातून तशीच थोडी पुढे गेल्यावर जीपचं तोंड पूर्णपणे पाण्याच्या प्रवाहाच्या साईडने जाते. आणि ही जीप पूर्णपणे वाहून गेल्याचे चित्र दिसत आहे. जीपने पाण्याचा प्रवाहाकडे तोंड केल्यावर जीपच्या छतावर बसलेले सर्वजण आणि जीप ड्रायव्हर जीव वाचवण्यासाठी पाण्यामध्ये उड्या मारतात परंतु सर्वजण पाण्यात वाहून जातात.
https://twitter.com/IamPoojaSingh2/status/1681287513636499458?s=20
सोशल मीडियावर हा व्हिडिओ @IamPoojaSingh2 या युजर आयडी वरून शेअर करण्यात आला आहे. हा विडिओ नक्की कोणत्या भागातील आहे हे समजू शकलेलं नाही. आतापर्यंत हा व्हिडिओ 29.3K लोकांनी पाहिला आहे. या व्हायरल व्हिडिओच्या खाली अनेक जणांनी मजेशीर कमेंट केल्या आहे. एका यूजर्सने म्हंटल कि, भावांनो तुम्हाला तुमच्या घरी जायचे होते की देवाच्या घरी हे मला समजत नाही. तर काहीजण म्हणत आहेत हा विडिओ भारतातील नाहीच