Viral Video | महिला शिक्षिकेने विद्यार्थ्यांकडून वर्गातच करून घेतला बॉडी मसाज; पाहा व्हिडिओ

Viral Video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video | सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ हे माहिती देणारे असतात. तर काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात. परंतु सध्या एक वेगळाच धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे. हा व्हिडिओ (Viral Video) राजस्थानच्या जयपुरमधील आहे. या ठिकाणी एका सरकारी शाळेतील शिक्षकेने विद्यार्थ्यांकडून तिच्या पायाची मालिश करून घेतलेली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. आणि त्या शिक्षिकेवर मोठ्या प्रमाणात टीका देखील केली जात आहे. व्हिडिओ पाहून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. शिक्षण व्यवस्थेवर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहे

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, एक महिला शिक्षिका वर्गात जमिनीवर उलटी झोपलेली आहे. तसेच एक विद्यार्थी त्या शिक्षिकेच्या पायावर उभे राहून तिच्या पायाची मालिश करून देत आहे. तर दुसरा विद्यार्थी तिथे उभा राहून मालिश करणाऱ्या विद्यार्थी खाली पडू नये म्हणून त्याला आधार देताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून सगळ्यांना खूप धक्का बसलेला आहे.

याबाबत शाळेच्या मुख्याध्यापका अंजू चौधरी यांनी देखील त्यांचे वक्तव्य दिले आहे. त्यांनी सांगितले आहे की, त्यांना या गोष्टीबद्दल काहीच माहित नव्हते त्यांनी सांगितले की, शिक्षिकेची तब्येत बिघडली असावी आणि तिने मुलांना मदत करण्यास सांगितले असावे .परंतु या प्रकरणात त्या महिला शिक्षिकेवर कारवाई करावी असे म्हणण्यात आलेले आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओनंतर शिक्षण विभाग आणि शाळा प्रशासनावर मोठा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे. तसेच या प्रकरणी त्या शिक्षिकेवर कठोर कारवाई करावी. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या वायरल व्हिडिओमुळे आता शिक्षकांची जबाबदारी आणि विद्यार्थ्यांसोबत प्रश्नचिन्ह उभारण्यात आलेले आहे.