हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेतील टीम इंडिच्याच्या पराभवानंतर विराट कोहलीने मोठा निर्णय घेतला आहे. त्याने कसोटी संघाच्या नेतृत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे अख्या क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. याआधी कोहलीने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी टी-20 संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला होता.
Cricketer Virat Kohli steps down as India Test captain pic.twitter.com/BM0Dfktg2B
— ANI (@ANI) January 15, 2022
त्याच्या या निर्णयामुळे त्याने वनडेचे कर्णधारपद गमावले. किमान कसोटी संघाच्या नेतृत्वपदी तरी आणखी काही वेळ तो संघाची धूरा सांभाळेल, असे वाटत होते. पण अखेर त्याने अचानकपणे कसोटी संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विराट कोहलीच्या या निर्णयामुळे भारतीय क्रिकेटमध्ये अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली आणि बीसीसीआय यांच्यामधील वाद सुरु होता. टी20 कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहली आणि बीसीसीआय असा वाद सुरु झाला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 58.82 टक्के सामने जिंकले आहेत. विराटच्या नेतृत्तावात 68 पैकी 40 सामने जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाने केलाय. विराट भारताचा सर्वाधिक यशस्वी कसोटी कर्णधार आहे.
दक्षिण आफ्रिकामध्ये कसोटी मालिकेत भारतीय संघाला 2-1 च्या फरकाने पराभवाला सामोरं जावं लागले होतं. या पराभवामुळे विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. धोनीने कसोटी कर्णधारपद सोडलण्यानंतर विराट कोहलीकडे धुरा सोपवण्यात आली होती. विराट कोहलीने भारतीय संघाला अनेक अशक्यप्राय विजय मिळवून दिले आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने विदेशात विजय मिळवले आहे. विराट कोहली भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने अनेक विजय संपादन केले आहेत.