पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट ठरू शकतो ट्रम्प कार्ड, असा आहे कोहलीचा रेकॉर्ड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – 16 ऑक्टोबरपासून T20 वर्ल्डकपला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्यात सगळ्याचे लक्ष विराट कोहलीच्या (Virat Kohli) कामगिरीवर असणार आहे. कारण कोहली (Virat Kohli) न केवळ पाकिस्तानविरुद्ध ट्रम्प कार्ड ठरू शकतो तर ऑस्ट्रेलियात त्याचे रेकॉर्ड्स आणि त्याची फलंदाजी भारताला मदतगार ठरू शकते.

भारत-पाकिस्तान सामना 23 ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. या ठिकाणी भारताचा वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये चांगला रेकॉर्ड आहे. या ठिकाणी भारताने पाकिस्तानविरुद्ध कोणताही टी-20 सामना खेळलेला नाही. मात्र वनडेत या ग्राऊंडवर पाकिस्तान संघाविरुद्ध भारताचा चांगला रेकॉर्ड आहे. येथे दोन भारत-पाक वनडे सामने झाले आहेत आणि दोन्हीमध्ये भारताने विजय मिळवला आहे.

विराटचा रेकॉर्ड
मेलबर्नमध्ये टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर आहे. त्याने येथील तीन सामन्यांत 1 हाफ सेंच्यरीच्या मदतीने 90 धावा केल्या आहेत. तर रोहित शर्माच्या नावावर चार सामन्यात 68 धावा या ठिकाणी दिनेश कार्तिकने दोन सामन्यात 8 धावा केल्या आहेत.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय