स्वाभिमानीकडून निवडणूक लढल्यानेच पराभवाचा सामना करावा लागला : विशाल पाटील

1
83
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे, 
सांगली लोकसभा मतदार संघातील जनतेने दिलेला कौल आम्ही मोठ्या खिलाडू वृत्तीने स्विकारत आहोत. कॉंग्रेसचे चिन्ह मिळण्यात आलेल्या अडचणी, अचानकपणे बॅट चिन्हावर लढवण्याचा घेतलेला निर्णय व तिहेरी लढत यामुळे आपल्याला पराभवाचा सामना करावा लागला. मतदारसंघात प्रथमच अनेक ठिकाणी जातीय समिकरणाने मतदान झाले त्याचाही फटका बसल्याचे दिसते. देशात व राज्यात सत्ताधार्यांच्या बाजूने असलेली लाट जिल्ह्यातही कार्यरत असल्याचे दिसते. एका पराभवाने खचून जाणार नाही, खूप कमी कालावधीत प्रचार करूण देखील ज्या मतदारांनी आमच्यावर विश्‍वास ठेवून मतदान केले आहे त्यांच्या प्रश्‍नासाठी यापुढेही कार्यरत राहणार आहोत. दुष्काळामध्ये जनतेच्या सोबत राहणार असून ज्यांनी मतदान केले त्यांचे आभार मानण्यासाठी मतदारसंघाचा दौराही करणार आहोत, संजयकाकांचे अभिनंदन, त्यांच्या चांगल्या कामात आमचे सहकार्य असेल आणी चुकतील तिथे सक्षम विरोधक म्हणून उभे राहून आवाज उठवु . अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here