जिल्ह्यात अनुसूचित जाती कल्याण समितीचा 24, 25 रोजी दौरा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | औरंगाबाद जिल्ह्यात अनुसूचित जाती कल्याण समितीचा दौरा 24 व 25 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात आहे. विधानसभा सदस्य तथा समितीच्या प्रमुख प्रणिती शिंदे आहेत. तर समितीचे सदस्य म्हणून आमदार डॉ. बालाजी किणीकर, संतोष बांगर, यशवंत माने, डॉ. किरण लहामटे, लहू कानडे, लखन मलिक, सुनील कांबळे, नामदेव ससाणे, टेकचंद सावरकर, प्रा.नरेंद्र भोंडेकर, अरूण लाड, राजेश राठोड, विजय ऊर्फ भाई गिरकर, बाळाराम पाटील, राजू आवळे आहेत.

या समितीचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. दोन दिवसीय दौऱ्यात समिती सदस्य जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपालिका प्रशासन, आरोग्य सेवा, शिक्षण, राज्य उत्पादन शुल्क, आरटीओ, महावितरण, समाज कल्याण, आर्थिक विकास महामंडळे, मनपा, जिल्हा परिषद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, पोलिस, एमआयडीसी आदींसह व शासकीय यंत्रणेतील इतर कार्यालयातील अनुसूचित जातींच्या प्रवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांची यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष व जात पडताळणी विषयक बाबींसंदर्भात, मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत चर्चा आणि बैठका घेणार आहेत, असे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त पी.जी. वाबळे यांनी कळवले आहे.

Leave a Comment