“कदाचित तुम्ही मला शेवटचं जिवंत पहात आहात”; जेलेन्स्की यांचा तीनशे खासदारांशी संवाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशियाकडून केल्या गेलेल्या युक्रेनवरील हल्ल्यामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. या दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेस्की यांनी सुमारे एका तासात अमेरिकेच्या 300 खासदार आणि अमेरिकी खासदारांशी खासगी पातळीवर व्हिडिओ कॉल करून संवाद साधला. यात जेलेन्स्की यांनी “कदाचित तुम्ही मला आता शेवटचं जिवंत पाहात असाल,” असे म्हंटले.

राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांनी अमेरिकी खासदारांना खासगीपातळीवर व्हिडिओ कॉल केला. त्यामध्ये त्यांनी रशियाकडून युक्रेनवर हल्ला केल्यापासून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांना मारण्यासाठी तीन वेळा प्रयत्न केले गेले आहेत. मी कीव्हमध्ये आहे. कीव्हच्या उतरेकडे रशियन सैन्याच्या फौजा येऊन पोहोचल्या आहेत. युक्रेनची हवाई हद्द सुरक्षित करण्याची खूप गरज आहे आणि नाटो कडून नो-फ्लाय-झोन घोषीत केल्याने किंवा अधिक लढाऊ विमाने पाठवण्यात आली तरच हे शक्य आहे.

जेलेन्स्की यांनी सुमारे एका तासात अमेरिकेच्या 300 खासदारांशी संवाद साधला आणि त्यांच्या स्टाफसोबतही चर्चा केली. युक्रेनच्या शहरांवर आता रशियाकडून जोरदार बॉम्बहल्ले करण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर युक्रेनची हवाई हद्द सुरक्षित करण्यासाठी जेलेन्स्की यांनी प्रयत्नही केले आहेत.

Leave a Comment