बुलडाणा प्रतिनिधी । मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार चैनसुख संचेती यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा आज मलकापूर येथे दौरा होता. रोड शो झाल्यानंतर संचेती यांच्या प्रचारार्थ प्रचार सभाही घेण्यात आली. प्रचार सभेत स्मृती इराणी यांनी चैनसुख संचेती आणि स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
भाषणात बोलत असताना स्मृती इराणी यांनी मतदारांना जनतेला आव्हान केले की, ‘तुम्हाला फक्त चैनसुख संचेती यांना नाही निवडून द्यायचे, तर तुम्हाला गोरगरीब जनतेच्या हितासाठी, शेतकऱ्यांसाठी, तरुणांच्या रोजगारासाठी एका भरभक्कम सरकारला म्हणजेच भाजपला निवडून द्यायचे आहे.’
आपल्याला दिवाळीला लक्ष्मी पूजन करायचे असेल आणि लक्ष्मी प्रसन्न करायचे असेल तर भाजपला निवडून आले पाहिजे कारण लक्ष्मी कोणत्या युवराजाचा हात पकडून नाही येत किंवा बंद पडलेल्या घड्याळीकडे पाहून नाही येत, लक्ष्मी येते तर ती कमळावर येते असं स्मृती इराणी’ असे म्हणत इराणी यांनी अप्रत्यक्ष टोला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला.