Monday, January 30, 2023

खालच्या पातळीवर बोलणार्‍या विरोधकांना मतदारांनी उत्तर दिलंय – सुरेश भोसले

- Advertisement -

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सातारा व सांगली अशा जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेल्या कराड तालुक्यातील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यावेळी डॉ. सुरेश भोसले यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. “या सहकारी संस्थेच्या निवडणुकीत आम्हाला राजकारण बाजूला ठेवायचे होते, या सर्व मतदारांनी सभासदांनी जे राजकारणी या निवडणुकीत पडले होते त्यांना बाजूला काढले. विरोधकांकडे आमच्याविरोधात बोलण्यासाठी काही मुद्देच नव्हते. त्यामुळे या निवडणुकीत खालच्या पातळीवर बोलणाऱ्या विरोधकांना मतदारांनीच उत्तर दिले असल्याचे डॉ. भोसले म्हणाले.

- Advertisement -

कृष्ण सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीत सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला यश मिळत असल्याने याबाबत डॉ. सुरेश भोसले यांनी पत्रकारांना माहिती दिली. यावेळी डॉ. भोसले म्हणाले कि, “सहकारी संस्थांच्या निवडणुका या मुद्द्यावर झाल्या पाहिजेत आमच्या विरोधात त्यांच्याकडे कोणतेही मध्ये नव्हते केवळ आमच्या वैयक्तिक टिका टिपणी केली. आता यापुढे गट-तट बाजूला ठेवून कोणावरही अन्याय न करता सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल.” असा विश्वास डॉ. भोसले यांनी यावेळी व्यक्त केला.

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या या निवडणुकीत सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलकडून डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर त्यांच्या विरोधात संस्थापक पॅनेलकडून कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश भोसले यांनी व रयत पॅनेलकडून डॉ. इंद्रजित मोहिते यांनी आव्हान दिले आहे. मात्र, मतमोजणीनंतर आता सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे पारडे जड होत असल्याचे दिसत आहे.

डॉ. सुरेश भोसले म्हणाले कि, इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा एकतर्फी सत्ता पुन्हा लोकांनी मोठा विश्वास दाखवून आमच्या हाती दिली. एवढं मोठं जेव्हा मताधिक्क्य मिळत त्यावेळेला तेवढी जबाबदारी पण वाढते. तेवढी अपेक्षाही वाढते. गेल्या सहा वर्षात आम्ही अत्यंत चांगले काम केले परंतु आताही पुढे चांगले काम करू. पुढील काळात कृष्णा कारखाना कसा चांगला दर देईल हे पाहिले जाईल.