हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – ‘द वॉल’ अशी ओळख असलेले राहुल द्रविड (Rahul Dravid) सध्या टीम इंडियाचे हेड कोच आहेत. द्रविडनंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोण असणार असा सवाल क्रिकेट रसिकांना पडला होता. त्यामुळे आता यासंदर्भात आता एक मोठी बातमी समोर आली आहे. द्रविडचा (Rahul Dravid) करार ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 दरम्यान वनडे वर्ल्ड कपनंतर संपणार आहे. मात्र त्याआधीच बीसीसीआयने टीम इंडियाचा पुढील कोच कोण असणार हे शोधून काढले आहे.
द्रविडनंतर पुढचा कोच कोण?
द्रविडनंतर (Rahul Dravid) व्हीव्हीएस लक्ष्मण टीम इंडियाचा कोच असणार आहे. जर बीसीसीआय द्रविडला हेड कोचपदी कायम ठेवण्याबाबत इच्छूक नसल्यास व्हीव्हीएस लक्ष्मणला भारताचा पुढील कोच केले जाऊ शकते. द्रविडच्या अनुपस्थितीत लक्ष्मणला टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आलं आहे. द्रविड (Rahul Dravid) कोव्हीड पॉझिटिव्ह असतानाही लक्ष्मणने टी 20,आशिया कप 2022 मध्ये हेड कोचची जबाबदारी पार पाडली होती.
एनसीएत क्रिकेटर तयार करण्यासोबतच लक्ष्मण 2022 च्या अंडर 19 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियासोबत होता. तसेच वेस्टइंडिजमध्ये युवा टीमसोबत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. टीममध्ये स्पिलिट कोचिंगच्या शक्यतेबाबत बीसीसीआय अजून तरी इच्छूक नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती