हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आशिया कप-2022 साठी भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी दिग्गज फलंदाज VVS Laxman याची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी BCCI ने याबाबतची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविडला कोरोनाची लागण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी BCCI ने सांगितले आहे. हे लक्षात घ्या कि, 28 ऑगस्ट रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याद्वारे भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेतील आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.
47 वर्षीय VVS Laxman हे सध्या NCA (बेंगळुरू) चे प्रमुख आहेत. तसेच झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी देखील VVS Laxman मुख्य प्रशिक्षक म्हणून टीम इंडियासोबत हरारेला गेला होता. यावेळी केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळलेली 3 सामन्यांची मालिका भारताने 3-0 ने जिंकण्यात यश मिळवले. आता राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत लक्ष्मण भारतीय संघाच्या आशिया कपमधील तयारीवर लक्ष ठेवणार आहे. आता उपकर्णधार केएल राहुल, दीपक हुडा आणि आवेश खान यांच्यासह लक्ष्मण हरारेहून दुबईला रवाना झाला आहे .
आशिया चषक स्पर्धेसाठी यूएईला निघण्यापूर्वी राहुल द्रविडची नियमित कोरोना चाचणी करण्यात आली होती, ज्यामध्ये त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. अशा परिस्थितीत तो सध्या संघासोबत यूएईला जाऊ शकलेला नाही. द्रविडवर सध्या BCCI चे वैद्यकीय पथक लक्ष ठेऊन आहेत. आता त्याच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. VVS Laxman
यावेळी BCCI कडून एका निवेदन देण्यात आले ज्यामध्ये म्हटले गेले की, कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर द्रविड देखील भारतीय संघात सामील होईल. मात्र, त्याला आणखी किती दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागेल, याबाबत BCCI ने काहीही सांगितलेले नाही. हे लक्षात घ्या कि, या आशिया कपमध्ये रोहित शर्मा टीम इंडियाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. VVS Laxman
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bcci.tv/
हे पण वाचा :
गेल्या 2 वर्षांपासून Ben Stokes ला सतावतेय Anxiety, मानसिक आरोग्याबाबत म्हणाला कि…
India vs Pakistan : “मियांदादचा तो षटकार आजही झोपू देत नाही” – कपिल देव !!!
‘या’ कारणांमुळे नाकारला जाऊ शकतो Life Insurance क्लेम !!!
Investment Tips : वयाच्या 21 व्या वर्षापासून अशाप्रकारे गुंतवणूक सुरू करून मिळवा लाखो रुपये !!!
‘या’ Multibagger Stock ने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला दुप्पट नफा !!!