हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आणि इंडियाचे वॉरेन बफे’ म्हणून ओळखले जाणारे Rakesh Jhunjhunwala यांचे रविवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने आर्थिक जगतात एकच शोककळा पसरली आहे. गौतम अदानी, एन चंद्रशेखरन, निखिल कामत यांच्यासह आर्थिक जगतातील अनेक दिग्गजांकडून त्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
संपूर्ण पिढीसाठी प्रेरणास्थान
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अदानी ग्रुपचे प्रमुख गौतम अदानी यांनी ट्विट करत म्हंटले की, “भारतातील या सर्वात महान गुंतवणूकदाराच्या अकाली निधनाने खूप दुःख झाले. Rakesh Jhunjhunwala यांनी संपूर्ण पिढीला आपल्या इक्विटी मार्केटवर विश्वास ठेवण्याची प्रेरणा दिली. मी आणि देश त्यांना नेहमीच आठवण ठेवेन.”
Extremely saddened by the untimely passing away of the most legendary investor that India has had. Shri Jhunjhunwala inspired an entire generation to believe in our equity markets with his brilliant views. We will miss him. India will miss him but we will never forget him. RIP🙏 pic.twitter.com/XrOBM3t0nG
— Gautam Adani (@gautam_adani) August 14, 2022
भारतीय बाजारपेठेला चालना दिली
देशातील प्रसिद्ध बँकर दीपक पारेख म्हणाले की,” Rakesh Jhunjhunwala हे आशावाद असलेले प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते ज्यांनी भारतीय बाजाराला वेळोवेळी गती दिली.”
आर्थिक बाजारपेठेची योग्य समज
बँकर असलेले उदय कोटक म्हणाले की,” Rakesh Jhunjhunwala हा माझा शालेय आणि महाविद्यालयीन मित्र होता. त्याला आर्थिक बाजाराची जबरदस्त समज होती. आम्ही तुम्हाला नेहमीच लक्षात ठेवू !!!”.
शेअर बाजारांबद्दलची सार्वजनिक समज लोकप्रिय केली
खाण व्यापारी असलेले अनिल अग्रवाल यांनी ट्विटद्वारे शोक व्यक्त करत म्हंटले की,” माझे मित्र आणि शेअर बाजारातील दिग्गज आता या जगात राहिले नाहीत… Rakesh Jhunjhunwala हे नेहमीच शेअर बाजाराविषयी लोकांच्या समजूतीला लोकप्रिय करणारे व्यक्ती म्हणून ओळखले जातील.”
भारतावर विश्वास
टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले की,” Rakesh Jhunjhunwala यांचा भारतावर आणि देशाच्या क्षमतेवर विश्वास होता.”
तुमच्यासारखा दुसरा कोणीही दिसणार नाही
झिरोधाचे संस्थापक निखिल कामत यांनी ट्विट केले की, “तुमच्यासारखा दुसरा कोणीही पाहता येणार नाही.”
एक्सिस सिक्युरिटीजचे एमडी आणि सीईओ असलेले बी गोपकुमार म्हणाले की, “Rakesh Jhunjhunwala नी टीव्ही स्टुडिओमध्ये आणलेली ऊर्जा कधीही विसरता येणार नाही. भारताच्या विकासावर त्यांना पूर्ण विश्वास होता. एखाद्या व्यक्तीने चांगल्या कंपन्यांमध्ये केलेली गुंतवणूक कायम ठेवली तर त्याची संपत्ती निश्चितच वाढते हे त्यांनी नेहमीच सिद्ध केले.”
आणखी एक तज्ज्ञ संदीप पारेख म्हणाले की,” Rakesh Jhunjhunwala हे असे व्यक्तिमत्त्व होते कि, ज्यांच्या भाषणाने देशाच्या विकासावर विश्वास नसलेल्या लोकांनाही ते पटले असते.” तसेच एम्बिट एसेट मॅनेजमेंटचे सीईओ सुशांत भन्साळी म्हणाले की,”झुनझुनवाला हे भारताच्या कथेतील सर्वात विश्वासू लोकांपैकी एक होते.”
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://en.wikipedia.org/wiki/Rakesh_Jhunjhunwala
हे पण वाचा :
Central Bank Of India ने FD वरील व्याजदरात केली वाढ, आता किती फायदा होणार ते पहा !!!
Axis Bank ने FD वरील व्याजदरात पुन्हा केले बदल, आता किती रिटर्न मिळेल ते पहा
‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना 15 वर्षात दिला 18110% रिटर्न !!!