आमचं स्थगिती सरकार नसून प्रगती सरकार आहे;मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांवर पलटवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
टीम, HELLO महाराष्ट्र।  विधानसभा अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे सरकार हे तीनचाकी रिक्षासारखे असून ते जास्त काळ ठिकाण नाही असा टोला लगावला होता.  तसेच हे सरकार प्रत्येक कमला स्थगिती देत असल्याने त्यांची स्थगिती सरकार अशी प्रतिमा होत आहे. यावर आता मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं असून विरोधकांचा खरपूस समाचार घेतला आहे.  
उद्धव ठाकरेंनी राज्यपालांनी मराठीत केलेल्या भाषणाचा दाखल देत, राज्यपालांनाही सत्ताबदलाचे वारे समजू लागले असल्याचा चिमटा काढला आहे. तसेच फडणवीसांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की महाविकासआघाडीचे सरकार स्थगिती सरकार नसून प्रगतीचं सरकार आहे. तसेच तीन चाकी रिक्षा सरकार असल्याच्या टीकेवर गरिबांना बुलेट ट्रेन नाही, तर तीन चाकी रिक्षाच परवडते असं सांगितले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील कोणत्याही कामाला स्थगिती देण्यात आली नसल्याचे देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान भाजपकडून सभागृहात आज देखील लवकरात लवकर शेतकऱ्यांना 25 हजार रुपये हेक्टरी मदत जाहिर करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. सभागृहात काही वेळ चाललेल्या आरोप- प्रत्यारोपनंतर भाजपाने सभात्याग करण्याचा निर्णय घेतला आहे.