हॅलो महाराष्ट्र । भारत पाकिस्तान यांच्यातील बिघडलेल्या द्विपक्षीय संबंधांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये आयोजित आशिया कपमध्ये बीसीसीआयने भारतीय संघ पाठविण्यास नकार दिला आहे. दरम्यान, आज पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी भारत या स्पर्धेत सहभागी न झाल्यास २०२१ मधील ट्वेंटी -२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी नकार देईल असं विधान पाकिस्तानातील डॉन वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी केलं.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपल्या संघाला पाकिस्तान पाठविण्यास सहमती दर्शविल्यानंतर, पाकिस्तानने आशिया कप स्पर्धेचे आपले होस्टिंग हक्क सोडले असल्याचे वृत्त पसरले आहे. त्यावर वासिम यांनी स्पष्टीकरण दिलं. यावर्षी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेच्या हक्कांची बांग्लादेश आणि पाकिस्तानमध्ये कुठलीही देवाणघेवाण होऊ शकली नाही आहे. असं त्यांनी सांगितलं.
“स्पर्धेच्या आयोजनाचे स्थळं बदलण्याचा पीसीबी किंवा आयसीसीकडे विशेषाधिकार नाही आहे, कारण हा निर्णय आशियाई क्रिकेट कौन्सिलचा (एसीसी) आहे. आशिया चषक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी आम्ही सध्या दोन ठिकाणांचा विचार करीत आहोत. दरम्यान, भारत या स्पर्धेत सहभागी होत नसल्याचा प्रश्न वासिम याना विचारला असता ते म्हणाले, “भारत आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानमध्ये खेळण्यास आला नाही तर आम्ही २०२१ च्या टी २० विश्वचषकात भाग घेणास नकार देऊ.” अशी धामिकवजा विधान वासिम यांनी केलं.
Won’t play T20 World Cup 2021, if India refuses to participate in Asia Cup: PCB
Read @ANI Story | https://t.co/DffV3uqLla pic.twitter.com/bq0fPjwEH8
— ANI Digital (@ani_digital) January 25, 2020
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”
हे पण वाचा-
कसोटी क्रिकेटमध्ये 5 लाख धावांचा टप्पा पार करणारी टीम बनली इंग्लंड
भाजपच्या नेत्यांना समोरासमोर बोलता येत नाही म्हणून पाठीवर खंजीर खुपसतात – प्रणिती शिंदे
सर्वांना माहित असतं आपला फोन टॅप केला जातो, पण मी त्याला गांभीर्याने घेत नाही – शरद पवार