मुंबई प्रतिनिधी | कोहिनूर स्क्वेअर प्रकरण राज ठाकरे यांच्या चांगलेच अंगलट येण्याची शक्यता आता निर्माण झाली असून त्यांना या प्रकरणी ईडीने नोटीस पाठवली आहे. ईडीने बजावलेल्या नोटिसी नुसार राज ठाकरे यांना २२ ऑगस्ट रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश ईडीच्या वतीने देण्यात आले आहेत. त्यामुळे राज ठाकरे या प्रकरणी ईडीच्या चौकशीला हजर राहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज ठाकरे नेहमीच मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका करत असतात. त्यांच्या टीकेचा पारा विधानसभा निवडणुकीला अधिक प्रमाणात चढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय जाणकारांनी वर्तवलेल्या शक्यते प्रमाणे निवडणुकीच्या आधी त्यांचे कोहिनूर मिल प्रकरण बाहेर काढण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीने कऱण्यात आला आहे.
दरम्यान आम्ही चौकशीला जाण्यास घाबरत नाही. कर नाही त्याला डर कशाची अशा भाषेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी माध्यमात प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच मोदी आणि शहा आधुनिक हिटलर आहेत. त्यांच्या विरोधात कोणी बोलले की त्यांच्यावर ईडी अथवा एसीबीच्या चौकशा लावण्याचा कार्यक्रम पध्द्तशीरपणे राभवला जातो. त्यांच्या भीती दाखवण्याला आम्ही भीत नाही. कारण कर नाही त्याला डर कशाची अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे या मनसे नेत्याने दिली आहे.