50 थरांची हंडी दीड महिन्यांपूर्वी आम्ही फोडली; मुख्यमंत्री शिंदेंची फटकेबाजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । सर्वात मोठी हंडी दीड महिन्यांपूर्वी आम्ही फोडली, आम्ही ५० थर लावले असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला लगावला. ठाण्यातील टेंभी नाका दहीहंडी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर,खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासहित अनेक दिग्गज उपस्थित होते.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला दहीहंडी उत्सव आता संपूर्ण महाराष्ट्रभर फोफावला आहे. आम्ही ५० थराची हंडी दीड महिन्यांपूर्वी फोडली.. सूरत टू गुवाहाटी.. ती हंडी फोडणं तसं कठीण काम होतं आणि ती खूप उंचही होती पण बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादानेच हे शक्य झालं. यापुढे असेच थर लावले जातील. अशी टोलेबाजी त्यांनी केली.

अडीच वर्षांपासून राज्यात कोविड निर्बंधामुळे दहीहंडी उत्सव साजरा करता आला नाही. आता सगळं सुरळीत झालं आहे. त्यामुळे यंदा कोणतेही निर्बंध लावले नाहीत. गणपती उत्सवदेखील अशाच जल्लोषात साजरा करायचा आहे. सण साजरे करा पण ते करत असताना काळजी पण बाळगा असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं