मुंबई । महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा वेळी कोरोना चाचणीवरून राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारी आकडेवारी जरी केली आहे. महाराष्ट्रात कोरोना चाचण्या कमी केल्याने आपण काय गमावले आणि काय कमावले? असा प्रश्न उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांनी आपली एक आकडेवारी जारी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आपली आकडेवार ट्विटवर पोस्ट करत म्हटलं कि, महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाचा दर अगदी सुरुवातीला जो ६ ते ७ टक्के होता. जूनपर्यंत तो दर २३ ते २४ टक्के झाला. याचाच अर्थ १०० चाचण्यांमधून २४ जणांना कोरोना असल्याचा दावा फडणवीस यांनी आपल्या आकडेवारीवरून केला आहे. याशिवाय मुंबईत संसर्गाचा दर २१ ते २७ टक्क्यांवर स्थिरावलेला असून चाचण्याची संख्या अतिशय कमी झाली असल्याचेही फडणवीस यांनी म्हटलं आहे. १ ते १९ जुलैच्या दरम्यान झालेल्या कोरोना चाचण्यांची सरासरी काढली तर प्रत्येकी दिवस ५ हजार ५०० चाचण्या झाल्याचं फडणवीस यांचे म्हणणं आहे.
महाराष्ट्र आणि मुंबईतील कोरोना बळींची संख्या दररोज सरासरी तेवढीच असून नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी हस्तक्षेप केल्यानंतर आणि चाचण्यांची संख्या वाढवल्यानंतर ही स्थिती सुधारली असल्याचा दावाही फडणवीस यांनी केला. नवी दिल्लीतल्या संसर्गाचा दर हा ३० ते ३५ टक्क्यांवरु ६ टक्क्यांवर आला आहे. ज्यामुळे कोरोना बळींच्या संख्येत घसरण झाली आहे. तरीही चाचण्यांची संख्या दररोज कायम आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. कोरोनावर मात करण्याचा, रूग्णसंख्या कमी करण्याचा आणि राज्यातील नागरिकांचे मृत्यू रोखण्याचा एकमात्र उपाय म्हणजे अधिकाधिक चाचण्या, संशयितांचे विलगीकरण आणि इतरांची सुरक्षा असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं.
कोरोना चाचण्या सातत्याने कमी करण्यामुळे आपण काय कमाविले आणि काय गमाविले❓
महाराष्ट्रातील संसर्गाचा दर अगदी प्रारंभी जो 6 ते 7 % होता, तो 8 जूनपर्यंत 17-18 टक्क्यांवर आला आणि आता 23 ते 24 %.
अर्थात 100 चाचण्यांमधून 24 जणांना कोरोना. pic.twitter.com/HnVICapodt— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 21, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”