हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची काल राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भेट घेतली. तब्बल साडेतीन तास चाललेल्या या बैठकीत राज्यातील आणि देशातील राजकारणातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचे समजत आहे. दरम्यान पवार- प्रशांत किशोर भेटीचे शिवसेनेकडून स्वागत करण्यात आले आहे. तसेच शरद पवार हे पंतप्रधान झाल्यास आम्हांला आनंदच आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना अरविंद सावंत यांनी दिली.
काँग्रेसच्या वाताहातीमुळं भाजपचं फावलं. राजकारणात सर्वाधिक अनुभवी आणि अभ्यासू शरद पवार आहेत. बाळासाहेबांनाही राष्ट्रीय पातळीवर मराठी माणूस हवा होता. महाविकास आघाडी ही शरद पवारांच्या नेतृत्वात निर्माण झालीय. त्यामुळं शरद पवार पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंदच होईल, असं अरविंद सावंत म्हणाले.
दरम्यान,निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील बैठक संपली आहे. तब्बल तीन तास दोघांमध्ये चर्चा झाली आहे. बैठकीतील तपशीलाबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ३ तासांच्या चर्चेत नेमकी कोणती रणनीती ठरली याची चर्चा आता सुरू झाली आहे. या भेटीमुळे राज्यासह देशाच्या राजकारणात काही बदल होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.