हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण गरम झालं असून विरोधकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक मोठं विधान केले आहे. मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार असून आरक्षण मुद्द्यावरून त्यांच्याशी चर्चा करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत, असे जयंत पाटील यांनी म्हंटल.
मराठा आरक्षणाला सगळ्या स्तरातून पाठिंबा मिळालेला आहे. मात्र, याबाबत सर्वोच्च न्यायालयात वेगळा निर्णय झाला. परंतु, राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याबाबत आता संसदेत आवाज उठवण्याची गरज आहे. त्यामुळे पंतप्रधानांशी भेट घेऊन त्यांना मराठा आरक्षण देण्यासाठी आग्रह करणार आहे,” अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
संभाजीराजे काय म्हणाले होते –
16 जून ला शाहू महाराजांच्या कोल्हापूरमधील समाधी स्थळावरूनच आम्ही आंदोलन करण्याची घोषणा संभाजी राजे यांनी केली. तसेच आधीचं आणि आजचं सरकार मराठा आरक्षणावर एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. तुम्ही खेळ सुरू केला आहे का? खेळ करू नका. मी संयमी आहे. त्याचा मला अभिमान आहे. तुम्ही माझा संयम पाहिला. आता संयमी राहणार नाही. आता काय होईल ते होईल. मी मेलो तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संभाजी छत्रपती यांनी दिला.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.