मुंबई प्रतिनिधी । राज्यातील सत्तास्थापनेचा पेच आणखी गुंतागुंतीचा बनलेला असताना या सर्व घडामोडीत शिवसेनेची ढाल बनून लढणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लीलावती हॉस्पिटलमधून ट्विट करुन पुन्हा एकदा सत्तास्थापनेच्या प्रयत्नात शिवसेना मागे हटलेली नाही असा विश्वास व्यक्त केला.
संजय राऊत यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना काल पासून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशीश करने वालों की कभी हार नही होती ।’ हम होंगे कामयाब, जरूर होंगे” अशा शब्दात राऊत यांनी हॉस्पिटलमधून शिवसेनेचा आत्मविश्वास कायम ठेवला आहे.
गेल्या १५ दिवसांपासून संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्रिपदासाठी आक्रमक भूमिकेत असलेल्या शिवसेनेची बाजू माध्यमांमध्ये ठामपणे मांडण्याची जबाबदारी संजय राऊत यांच्यावर आहे. रोज सकाळी ट्विट आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संजय राऊत शिवसेनेची बाजू मांडत आहेत. मात्र ऐन सत्तास्थापनेच्या घडामोडीत त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं त्यामुळे आता शिवसेनेची बाजू कोण मांडणार हा प्रश्न पक्षासमोर होता. मात्र संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे रुग्णालयातून ट्विट करत अजूनही आम्ही आशा सोडली नाही असा विश्वास शिवसैनिकांना दिला आहे.
“लहरों से डर कर नौका पार नहीं होती,
कोशीश करने वालों की कभी हार नही होती ।’
बच्चन.
हम होंगे कामयाब..
जरूर होंगे…— Sanjay Raut (@rautsanjay61) November 12, 2019