शरद पवार म्हणाले करोनाविरुद्धची लढाई आपण जिंकू, परंतु..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळे राज्यात जमाव बंदी लागू करण्यात आलेली असतानाही लोक ती गांभीर्याने घेत नाही आहेत. अनेक लोकांनी जमाव बंदीचा आदेश झुगारून खासगी वाहनांनी प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे मुंबई-पुण्यासह राज्याच्या अनेक भागात वाहतुकीची कोंडी होत असून त्यामुळे गर्दीही होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.

”माझे नागरिकांना आवाहन आहे की अपरिहार्यता असल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये. प्रधानमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री यांच्या आवाहनाची अति गांभार्याने नोंद घेऊन पोलीस आणि शासकीय यंत्रणांना सहकार्य करावे. ही लढाई आपण जिंकणारच, गरज आहे संयम, समंजसपणा व योग्य दक्षतेची!” असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

”कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य व केंद्र सरकारनं काही निर्णय घेतले आहेत. त्या निर्णयांची गांभीर्याने नोंद घेऊन कृती करण्याची आवश्यकता आहे. सरकारनं नागरी भागांमध्ये जमावबंदीचा निर्णय घेतला आहे. परंतु अजूनही अनेक शहरांत व काही ठिकाणी लोकांचे घोळके बघायला मिळतात,” अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

 

Leave a Comment