सांगली प्रतिनिधी । दुष्काळी जत तालुक्यातील अपघातग्रस्तांना तात्काळ मदतीचा हात मिळावा., त्यांचे प्राण वाचावेत यासाठी चिकालागीं मठाचे मठाधीपदी तुकाराम महाराज यांनी जत तालुक्यात मानव मित्र हा नवीन उपक्रम हाती घेतला आहे. तुकाराम महाराजांची हि संकल्पना अनेकांना आवडली आहे. पुणे येथील उद्योगपती बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या पुतण्याच्या विवाह सोहळ्यात हार तुऱ्यांना फाटा देत २५१ हेल्मेट लग्नामध्ये आलेल्यांना भेट दिले आहेत. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दीड महिन्यांपूर्वी तुकाराम बाबा महाराज हे कामानिमित्त सांगलीला येत होते. वाटेतच एका मोटारसायकलचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांना वेळेत मदत न मिळाल्याने दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागला. यावेळी व्यथित झालेल्या तुकाराम महाराजांनी संपूर्ण जत तालुक्यात गावोगावी मानव मित्र हि संकल्पना राबविण्याचा निश्चय केला. या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक संकल्पना पुढे आल्या, त्यातीलच एक उपक्रम म्हणजे हेल्मेट वाटप हा होता. तुकाराम महाराजांची हि संकल्पना अनेकांना आवडली आहे.
त्याचीच प्रचिती म्हणून पुण्यातील वाघोलीचे प्रसिद्ध उद्योगपती बाळासाहेब पाटील यांच्या पुतण्याच्या विवाह सोहळ्यात आली. बाळासाहेब पाटील यांनी पुतण्याच्या शाही विवाह सोहळ्यात हार तुरे फेटे व सत्काराला फाटा देत लग्नामध्ये आलेल्यांना २५१ हेल्मेटचे वाटप केले. या उपक्रमातून त्यांनी हेल्मेटचे महत्व आणि मानवी प्राण याचे महत्व अधोरेखित करून दिले.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.