तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज रुग्णांच्या नातेवाईकांची फिरफिर होत आहे, अशी टीका माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केंद्र सरकारवर केली. तसेच, देवेंद्र फडणवीसांवरही खडसेंनी घणाघाती टीका केली होती. त्यावरुन, भाजपाआमदारा राम सातपुते यांनी खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यास, खडसेंच्या कन्या अॅड. रोहिणी खडसेंनी प्रत्युत्तर दिलंय.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा भासत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे. यामध्ये रविवारी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पक्षाच्या जिल्हा कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या ठिकाणी खडसे यांनी भेट दिली.

‘नाथाभाऊ आपण आयुष्यभर पैसे खायचे सोडून दुसरं काहीच केलं नाही आणि देवेंद्र भाऊ बद्दल बोलत आहात. विरोधी पक्षनेता असताना तोडपाणी आणि मंत्री झाले तेव्हा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप आमदार राम सातपुते यांनी केलाय. तसेच, निष्कलंक देवेंद्र फडणवीसांवर बोलण्या अगोदर आरसा बघा सगळं लक्षात येईल,” अशी घणाघाती टीका राम सातपुते यांनी एकनाथ खडसेंवर केली आहे. त्यानंतर, एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांनी राम सातपुते यांना प्रत्युत्तर दिलंय.