हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पाऊस पडत असून अतिवृष्टी निर्माण झाली आहे. कोल्हापूर सातारा आणि सांगली येथे पूरस्थितीची शक्यता असून त्याच पार्श्वभूमीवर आता पुणे-बंगळुरू महामार्ग ठप्प झाला आहे.
पुणे -बंगलोर महामार्गावरील दूधगंगा वैनगंगा नद्यांची पातळी वाढली आहे याचं पार्श्वभूमीवर ही वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहतूक थांबवल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तब्बल 5 ते 6 किमी रांगा लागल्या आहेत. अनेक ट्रक वाहतूक गाड्या ठप्प झाल्या आहेत.
दरम्यान पंचगंगा नदीने देखील पातळी ओलांडली आहे. तसेच आज साताऱ्यातील कोयना धरणातुन विसर्ग चालू करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे-बंगळुरु हा पश्चिम महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाचा असलेला महामार्ग ठप्प झाला असून रस्त्यांवर वाहनांची गर्दी झाली आहे.