हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । rave party : बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर हीचा भाऊ आणि बॉलिवूडचे सुपर व्हिलन मानले जाणारे शक्ती कपूर यांच्या मुलगा असलेल्या सिद्धांत कपूर याला रविवारी रात्री बेंगळुरू येथील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या हॉटेलमध्ये सुरु असलेल्या रेव्ह पार्टी दरम्यान छापा टाकून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या छाप्या नंतर अशा प्रकारच्या रेव्ह पार्ट्या येथे सातत्याने सुरू असल्याचे समोर आले. ज्यामध्ये रात्रभर डान्स, ड्रग्ज, नशा आणि मनोरंजनाची धूम असते.
असे म्हंटले जाते की, रेव्ह पार्ट्या (rave party) या सामान्यतः महानगरांतील हॉटेल्स आणि मोठ्या शहरांशी जोडलेल्या भागातील फार्म हाऊसमध्ये आयोजित केल्या जातात. ज्यामध्ये अनेक श्रीमंत तरुण-तरुणींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो. अशा पार्टीमध्ये सर्वसामान्यांना स्थान नसते. ही पार्टी फक्त एका रात्रीसाठीच आयोजित केली जाते. तसेच या पार्टीमध्ये लाखो रुपयांची उधळपट्टी देखील केली जाते.
देशातील जवळपास सर्वच मोठ्या शहरांमध्ये अशा प्रकारच्या रेव्ह पार्ट्या (rave party) आयोजित करण्याचा कल वाढला आहे. दिल्ली-मुंबईप्रमाणेच आता जयपूर, लखनौ, बंगळुरूसारख्या शहरांमध्येही रेव्ह पार्ट्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा पार्ट्यांमध्ये ऍसिड आणि एक्स्टसी नावाचे खास दोन प्रकारचे ड्रग्ज जास्त घेतले जातात. हे ड्रग्ज घेणारा सहा ते आठ तास नशेमध्ये अथक डान्स करू शकतो. मात्र हे लक्षात घ्या कि, अशा प्रकारचे ड्रग्ज हे शरीरासाठी खूपच हानिकारक आहेत.
या ड्रग्जची विक्री करणे तसेच त्याचे सेवन करणे बेकायदेशीर आहे, मात्र अशा रेव्ह पार्ट्यांमध्ये (rave party) ते सहजरित्या उपलब्ध होते. या ड्रग्जमुळे सतत डान्स करण्याची ईच्छा बळावते. त्याचबरोबर ते खूप महाग देखील आहेत. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते ऍसिड आणि एक्स्टसीसारखे महागडे ड्रग्ज घेतात आणि ज्यांच्याकडे इतके पैसे नाहीत ते चरस किंवा गांजा खरेदी करतात.
… तर रेव्ह पार्टी म्हणजे दारू, ड्रग्ज, म्युझिक, डान्स आणि सेक्स यांचे कॉकटेल. अशा पार्ट्या अत्यंत गुप्त पद्धतीने आयोजित केल्या जातात. यासाठी खास WhatsApp द्वारे गुप्तपणे ग्रुप तयार करून लोकांना यामध्ये बोलावले जाते. तसेच ज्यांना या पार्टीमध्ये बोलावले जाते, ते या ग्रुप बाहेरच्या लोकांना याबाबत काही सुगावाही लागू देत नाहीत.
ड्रग्ज विक्रेत्यांसाठी अशा पार्ट्या हे नंदनवन असतात. अशा पार्ट्या या बेकायदेशीर असतात. या पार्ट्यांसाठी मुंबई, पुणे, खंडाळा, पुष्कर आणि दिल्लीच्या आसपासचे भाग सर्वात योग्य आहेत. हे लक्षात ठेवा कि, काही काळापूर्वीच आयपीएलचे दोन खेळाडू देखील अशा प्रकारच्या रेव्ह पार्टी मध्ये अडकले होते.
श्रीमंत आणि मोठ्या घरातील मुले-मुली रात्रीच्या अंधारात अशा पार्टीत सहभागी होऊन दारू आणि नशा करतात. अशा पार्ट्यांमध्ये केवळ मुलेच नाही तर मुलीही मोठ्या संख्येने सहभागी होतात. विशेषतः महानगरातील तरुणांमध्ये तर अशा पार्ट्यांची क्रेझ वाढते आहे. rave party
अशा रेव्ह पार्ट्यांमध्ये मोठ्या आवाजात म्युझिकही वाजवले जाते. हे मोठ्या आवाजातील म्युझिक आणि मादक पदार्थांच्या या मिश्रणाने सर्व बंध तुटतात. आता अशा प्रकारच्या पार्ट्यांच्या जागेत आता हट देखील उभे करण्यास सुरुवात झाली आहे. ज्यामुळे तरुणाई अशा पार्ट्यांच्या आणखी जवळ येऊ शकतात. rave party
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्यात किंचित वाढ तर चांदीमध्ये घसरण !!! आजचे नवे दर पहा
सोनाक्षी सिन्हा चा कलरफुल फोटोशूट..
मानुषी चिल्लरचा नवा लूक चर्चेत.
शक्ती कपूरचा मुलगा सिध्दांत कपूर पोलिसांच्या ताब्यात; ड्रग घेतल्याचा आरोप