हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या जागतिक पातळीवर प्रचंड अनिश्तिततेचे वातावरण आहे. याचदरम्यान, भारताचा शेजारील देश असलेला पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटात सापडल्याचे दिसत आहे. हा देश सध्या अगदी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. अशातच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडूनही बेलआउट पॅकेज मिळण्याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात समोर आलेली नाही. मात्र, याच दरम्यान काही तज्ज्ञ एका अशा खजान्याबाबत चर्चा करत आहेत ज्याद्वारे या देशाचे नशीबच पालटू शकेल.
वास्तविक तज्ज्ञ Blue Economy विषयी चर्चा करत आहे. तज्ज्ञांच्या मते, जर त्याचा योग्य वापर केला तर या देशाची सध्याची आर्थिक स्थिती क्षणार्धात बदलू शकेल. कारण ब्लू इकॉनॉमीच्या माध्यमातून या देशाला मोठा महसुला मिळू शकेल, असा त्यांचा विश्वास आहे. तसेच याद्वारे या देशाचा सामाजिक स्तर सुधारून तेथील गरिबी दूर होऊ शकेल.
Blue Economy बाबत जाणून घ्या
Blue Economy ला समुद्राशी संबंधित उद्योग आणि सेवा असे म्हंटले जाते. याद्वारे कोणत्याही देशाचा महसूल वाढण्यास चांगलीच मदत होते. यामध्ये ऊर्जेव्यतिरिक्त शिपिंग, मॅरीटाइम, कृषी, मत्स्यपालन आणि पर्यटन क्षेत्रांचा समावेश होतो. हे जाणून घ्या कि, पाकिस्तानला 1050 किमीची किनारपट्टी लाभली आहे. ज्यामध्ये जवळपास तीन लाख चौरस किलोमीटर खास आर्थिक क्षेत्राचा देखील समावेश आहे.
100 अब्ज डॉलर्स पर्यंत वाढू शकेल उत्पन्न
पाकिस्तानमधील काही आर्थिक तज्ज्ञांच्या मते, Blue Economy च्या माध्यमातून पाकिस्तानला 100 अब्ज डॉलर्सपर्यंतचे उत्पन्न मिळू शकेल. मात्र सध्या हा देश फक्त एक अब्ज डॉलर्सपर्यन्तचीच कमाई करू शकला आहे. तसेच, यातील बहुतेक रक्कम ही मत्स्यव्यवसाय, किनारी पर्यटन आणि सागरी महसूलातून मिळते. तज्ज्ञांच्या मते, आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पाकिस्तान आता ब्लू इकॉनॉमीवर लक्ष केंद्रित करून सीफूडची निर्यात वाढवू शकेल.
आर्थिक स्थिती सुधारण्याचा जबरदस्त मार्ग
Blue Economy च्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला चालना देण्याची चांगली संधी आता पाकिस्तानला उपलब्ध झाली आहे. अनेक लोकं असेही म्हणतात की, यामध्ये अशी अनेक संसाधने आहेत ज्यांचा योग्य पद्धतीने वापर केला गेलेला नाही. त्याचप्रमाणे आतापर्यंत पाकिस्तानमध्ये या संसाधनांच्या वापरावर बंदी देखील घालण्यात आली आहे. मात्र इतर देश या क्षेत्राद्वारे अब्जावधी डॉलर्सची कमाई करत आहेत. त्यामुळे आता आपल्या किनारपट्टीचा वापर करून, पाकिस्तानला मध्य पूर्व, आफ्रिका आणि इतर देशांमध्ये आपला व्यापार आणि निर्यात वाढवावी लागेल. जेणेकरून या देशाची अर्थव्यवस्था लवकरात लवकर रुळावर येऊ शकेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.un.org/regularprocess/sites/www.un.org.regularprocess/files/rok_part_2.pdf
हे पण वाचा :
DBS Bank ने FD वरील व्याजदरात केली वाढ, तपासा नवीन दर
दुचाकींवरून प्रवास करताना Toll Tax का द्यावा लागत नाही ??? जाणून घ्या यामागील कारण
Gold Price : आठवड्याभरात सोने-चांदी महागले, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
कोणत्या Income Tax Slab अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना किती कर भरावा लागेल ??? जाणून घ्या सर्व तपशील
Gold Price : विक्रमी उच्चांकावरून घसरले सोने, सध्याच्या यामध्ये गुंतवणूक करावी का ??? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत