Doorstep Banking म्हणजे काय ??? त्याचा फायदा कोणाकोणाला मिळेल ते जाणून घ्या

Doorstep Banking
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Doorstep Banking : सध्याच्या काळात बँकिंगशी संबंधित अनेक कामे घरबसल्या करण्याचो सुविधा मिळते आहे. मात्र तरीही काही कामांसाठी आपल्याला बँकेमध्ये जावेच लागते. जसे कि पैसे काढणे, चेक जमा करणे, पैसे जमा करणे. आता बँकांकडून या सेवादेखील घरबसल्या पुरवल्या जात आहेत. मात्र याबाबतची माहिती फारच कमी लोकांना आहे. हे लक्षात घ्या कि, बँकांकडून दिल्या जाणाऱ्या या सुविधेला डोअरस्टेप बँकिंग असे म्हंटले जाते. चला संबंधित माहिती जाणून घेउयात…

PSB Alliance : Doorstep Banking

बँकांनी खास ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांसाठी Doorstep Banking ची सुविधा सुरू केली होती. मात्र आता काही बँकांकडून सर्वच ग्राहकांना या सुविधा दिली जाते आहे. ज्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी कॅश पिकअप, पैसे काढण्यासाठी कॅश डिलिव्हरी आणि चेक डिपॉझिट आणि आर्थिक व्यवहारांसाठीच्या सुविधांचा देखील समावेश आहे.

‘या’ बँका देत आहेत डोअर-स्टेप सुविधा

सध्या देशातील अनेक बँकांकडून ग्राहकांना डोअर-स्टेप सुविधा देत आहेत. यामध्ये एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक इत्यादींचा समावेश आहे. मात्र, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी बँकांकडून काही शुल्क देखील आकारले जाते. जे प्रत्येक बँकेनुसार वेगवेळे असतील. Doorstep Banking

What is Doorstep Banking Facility by HDFC Bank | Bank at Your Doorstep |  Regular or On Call Basis - YouTube

अशा प्रकारे घ्या डोअर-स्टेप बँकिंगचा लाभ

ग्राहकांना आपल्या बँकेच्या कस्टमर केअरशी बोलून अथवा बँकेच्या वेबसाइटवरील सूचनांचे पालन करून Doorstep Banking चा लाभ घेता येईल. नुकतेच, अनेक बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांना लाईफ सर्टिफिकेट सादर करण्यासाठी ही सेवा दिली गेली होती.

डोअरस्टेप बँकिंगसाठी किती शुल्क आकारले जाईल ???

Doorstep Banking चे शुल्क प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळे असतील. उदाहरणार्थ, एचडीएफसी बँक कॅश पिकअप आणि डिलिव्हरीसाठी 200 रुपये + कर आकारत आहे. तसेच एचडीएफसी बँकेकडून सध्या ही सेवा फक्त ज्येष्ठ नागरिकांना दिली जात असली तरी. बँक कमीत कमी 5000 रुपये तर जास्तीत जास्त 25000 रुपयांची कॅश डिलिव्हरी देते. त्याच वेळी, ही बँक 100 रुपये +टॅक्स सहीत उर्वरित आर्थिक व्यवहारांच्या सेवांसाठी डोअरस्टेप बँकिंग सुविधा देते.

Doorstep Banking

लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

इथे हे लक्षात घ्या की, Doorstep Banking सुविधा मोफत मिळणार नाही. यासाठी काही पैसे द्यावे लागतील. तसेच केवायसी व्हेरिफाय असलेल्या खातेधारकांनाच ही सुविधा मिळेल. त्याच वेळी, काही बँकांकडून फक्त एका विशिष्ट सर्कलमध्येच ही सुविधा पुरवली जात आहे. उदाहरणार्थ, बँकेच्या शाखेच्या 3-5 किलोमीटरच्या परिघात राहणाऱ्या लोकानंच डोअरस्टेप बँकिंगचा लाभ मिळेल.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/dsb

हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर पहा
आता Yes Bank ची अनेक कामे Whatsapp वरच करता येणार, कसे ते समजून घ्या
Budget Cars : 10 लाखांच्या बजटमधील ‘या’ 5 उत्कृष्ट कार, फीचर्स अन् किंमत तपासा
आता Home Loan घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या सहजपणे मिळवा पैसे
Vodafone Idea : अनलिमिटेड डेटा अन् कॉलिंगसोबत मिळवा Disney + Hotstar चे फ्री सबस्क्रिप्शन