हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । QR Code : कोरोना काळापासून ऑनलाइन पेमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र, खऱ्या अर्थाने 2016 सालच्या नोटबंदीनंतर ऑनलाइन पेमेंटची प्रक्रिया वेगाने सुरू झाली. तेव्हापासूनच सामान्य लोकांमध्ये QR Code हा शब्द ऐकू येऊ लागला आहे. हे जाणून घ्या कि, QR कोड द्वारे पैसे ट्रान्सफर करणे एक्दम सोपे होते. आपल्याला अनेक पॅकेट्स आणि वेबसाइट्सवर देखील QR कोड दिसून येतात. मात्र QR कोड का बनवले जातात? किंवा QR कोड म्हणजे काय आणि तो आपल्या रोजच्या जीवनात कसा उपयोगी ठरतो??? याविषयीची माहिती आज आपण जाणून घेउयात…
QR Code म्हणजे काय ???
QR कोडचे पूर्ण नाव Quick Response Code असे आहे. QR Code खूप वेगाने काम करतो. QR कोड हा square box मधील एक पॅटर्न आहे, ज्यामध्ये URL आणि मोबाइल नंबर लपविला जातो. हे एका पॅटर्नच्या स्वरूपात असते, जेणेकरून त्यामध्ये कोणता नंबर किंवा वेब एड्रेस दिला आहे हे पाहून समजून येणार नाही. आज जगभरातील अनेक कंपन्यांकडून त्याचा वापर केला जातो आहे.
QR कोड कुठे वापरला जातो ???
शॉपिंग सेंटर किंवा कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये QR Code स्कॅन करून अगदी सहजपणे पेमेंट केले जाते. यामुळे आपल्याला सोबत कॅश ठेवण्याची गरज भासत नाही. याद्वारे फोनच्या मदतीने पैसे देणे सोपे होते. याबरोबरच कोणतीही माहिती मिळवण्यासाठी देखील QR कोड वापरता येतो.
आजकाल प्रत्येक प्रॉडक्ट्ससाठी एक QR कोड दिला जातो. जो स्कॅन करून त्या त्या विशिष्ट प्रॉडक्ट्सची माहिती सहजपणे मिळते. तसेच याचा वापर कोणत्याही वेबसाइटवर लॉग-इन करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. यामुळे पासवर्ड पुन्हा पुन्हा टाकण्याचा वेळही वाचतो.
QR कोड कसा तयार करावा ???
जर एखाद्याला स्वतःचा विशिष्ट् QR Code बनवायचा असेल तर त्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. ते आपल्या फोनद्वारे अगदी सहजपणे बनवता येईल. QR कोड बनवण्यासाठीच्या स्टेप्स खालील प्रमाणे आहेत-
कोणत्याही QR कोड मेकर वेबसाइटवर क्लिक करा.
यानंतर एक वेबसाइट उघडेल जिथे URL, Image, VCard, Email सारखे अनेक पर्याय असतील .
जर आपल्याला वेबसाइट किंवा इतर प्रॉडक्ट्सचा QR कोड तयार करायचा असेल तर त्याचा URL टाकू शकता.
URL टाकल्याबरोबर वेबसाइटचा QR Code लगेचच तयार होईल.
हा QR कोड सेव्ह करून नंतर वापरता येतो.
QR कोड कसा स्कॅन करावा ???
UPI पेमेंटसाठी अनेक मोबाइल Apps आहेत, जे प्लेस्टोअरवरून फोनमध्ये डाउनलोड करता येतील. या Apps मध्ये नाव, फोन नंबर, ईमेल आयडी, आधार आणि पॅन कार्ड डिटेल्स, पिन किंवा पासकोड, तसेच बँक अकाउंट आणि त्याच्याशी संबंधित इतर माहिती यांसारखी अनेक प्रकारची माहिती द्यावी लागेल. यानंतर आपल्याला App द्वारे पेमेंट करता येईल.
यानंतर पेमेंट करण्यासाठी App मध्ये सुरुवातीला पासकोड टाकावा लागेल. यानंतर, पहिल्या क्रमांकावर स्कॅन क्यूआर कोडचा पर्याय असेल. त्यावर क्लिक करताच QR Code स्कॅनिंग सुरू होईल. मात्र स्कॅन करण्यासाठी आपल्या फोनचा कॅमेरा QR कोडजवळ ठेवा.
यानंतर आपल्या UPI App कडून तो लगेचच स्कॅन केला जाईल. यानंतर पेमेंट करण्यासाठी रक्कम एंटर करण्याचा पर्याय स्क्रीनवर दिसून येईल आणि शेवटी, पासकोड एंटर केल्यानंतर, पेमेंट प्रक्रिया पूर्ण केली जाईल. कोणत्याही UPI पेमेंट App मध्ये स्कॅन करण्याचा आणखी एक मार्ग आहे. जेव्हा तुम्ही स्कॅन करण्यासाठी App उघडता तेव्हा त्यात एक पर्याय गॅलरी असते. या गॅलरीत QR कोडचा फोटो टाकूनही पेमेंट करता येईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला द्या : https://play.google.com/store/apps/details?id=com.gamma.scan&hl=en_IN&gl=US
हे पण वाचा :
Mobile phone ची बॅटरी लाईफ कशी वाढवायची ते समजून घ्या
Home Loan वर किती टॉप अप लोन मिळवता येईल ??? तज्ञ काय म्हणतात ते जाणून घ्या
आधार कार्ड- मतदान ओळखपत्र होणार लिंक; जाणून घ्या प्रोसेस
Income tax :रोख रक्कम अन् सोन्याप्रमाणेच घरांच्या संख्येवरही काही मर्यादा आहेत का??? जाणून घ्या
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज घसरण, नवीन भाव तपासा