औरंगाबाद : लॉकडाऊन हे सोल्युशन नाही. कधीच नव्हते आणि नसेलही. प्रशासनाने नियमांचे पालन करण्यासाठी मोठी फौज रस्त्यावर उतरवायला हवी होती. लॉकडाऊन हा पर्यायच असू शकत नाही, अशी टीका औरंगाबाद पूर्वचे भाजप आमदार अतुल सावे यांनी केली. लॉकडाऊन मध्येही नागरिक रस्त्यावर आहेत, मग या लॉकडाऊनचा उपयोग काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
दररोज शहरात हजारांच्या पुढे रुग्णसंख्या निघत आहे. संपूर्ण शहर हॉटस्पॉट होण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले असताना शहरात ३० मार्चपासून संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. ३० मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत हा लॉकडाऊन लागू असेल. लॉकडाऊनच्या काळात किराणा दुकाने, दूध, भाजी देखील दुपारी १२ पर्यंतच उपलब्ध होणार आहे. त्यानंतर मात्र सर्व गोष्टी बंद केल्या जातील.
प्रशासनाच्या या निर्णयावर आमदार अतुल सावे म्हणाले, सध्याच्या परिस्थितीला लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही. यापेक्षा नियमावली कडक करायला हवी होती. शनिवार रविवारच्या कडक लॉकडाऊन मध्येही नागरिक रस्त्यावर फिरत होते. तर याचा काय फायदा होणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group