बीपी हाय झाला असल्यास काय करावे ; चला जाणून घेऊया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। आजकाल कोणताही आजार म्हंटलं की त्यासाठी वय हा मुद्धा नसतोच. कोणत्याही वयातील लोकांना हल्ली वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते. आजकाल हल्ली जमाना झटपट बदलत चालला आहे. त्यामुळे त्याचे परिणाम वाईट होत आहेत. बीपी हाय झालं, की आपण डॉक्टर कडे जातो किंवा अनेकदा डॉक्टरकडे न जाताही केमिस्टच्या सल्ल्याने औषध घेण्याचा प्रकार सर्रास चालतो.हाय बीपीचा त्रास होऊ नये, बीपी नियंत्रित राहावं ह्यासाठी आपल्याला आपल्या जीवनशैलीत काय काय बदल करणं गरजेचं आहे ते बघूया…

आहारात बदल—-

आपल्या आहारात भरपूर भाज्या, धान्य आणि फळांचा समावेश करून तुम्ही तुमचा रक्तदाब नियंत्रित ठेवू शकता, आहारात चरबीयुक्त आणि रक्तातील कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढण्यास कारणीभूत ठरणारे पदार्थ कटाक्षाने टाळावेत. त्याने शरीर आणि त्याची रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होण्यास मदत होते.

व्यायाम —

नियमितपणे आणि योग्य व्यायाम केल्याने वजन,तर कमी होतेच शिवाय शरीराचे कार्य सुरळीत राहायला मदतही होते.रक्तदाब नियंत्रित राहण्याबरोबरच इतरही आजार नियमित व्यायामाच्या सवयीमुळे सहज टाळले जाऊ शकतात.नियमित व्यायाम करण्याने शरीर सुदृढ राहते.

मद्यपान आणि धुम्रपान

आजकाल अनेक लहान वयातील मुले सुद्धा मद्यपान आणि धूम्रपान करण्यास सुरुवात करतात पण हे शरीरासाठी फार हानिकारक आहे. शिवाय धूम्रपान केल्याने रक्तदाबावरचे नियंत्रण जाऊन हृदयविकाराचा झटका येण्याचीही शक्यता असते त्यामुळे, धूम्रपान करणे टाळावे, ह्यासाठी काय करता येईल ह्याबद्दल तज्ञ डॉक्टर आपली मदत करू शकतात.

पुरेशी झोप —

हल्ली दिवसाच्या चोवीस तासांमध्ये कामाचे तास जास्त आणि झोपेचे तास कमी, अशी काहीशी अयोग्य विभागणी झालेलं सगळीकडे दिसून येते, मात्र ह्यामुळे शरीरावर अतिरीक्त ताण येतो आणि परिणामतः रक्तदाब अनियंत्रित होतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’