उद्योगपती पियुष जैन यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात सापडलेल्या कोट्यवधी रुपयांचे काय होणार ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जीएसटी इंटेलिजन्सने केलेल्या कारवाईत कानपूरचे व्यापारी पीयूष जैन यांच्या घरातून 257 कोटी रुपये रोख आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत. आता केंद्रीय तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालय (ED) देखील या अब्जाधीश परफ्यूम व्यापार्‍याविरुद्ध आपला कडा आवळताना दिसत आहे.

एवढ्या मोठ्या रकमेची वसुली लोकांनी वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्यांमधून पाहिली. नोटांच्या घड्या होत्या. यानंतर आता एवढ्या पैशाचे काय होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारी खाते संपूर्ण रक्कम जप्त करणार की आणखी काही होणार? याबाबत जाणून घेउयात.

दोन प्रकारच्या परिस्थिती असतील
या प्रकरणातील तज्ञांचे म्हणणे आहे की, अशा प्रकरणात दोन प्रकारच्या परिस्थिती असू शकतात. पहिली, वसूल केलेल्या पैशांमधून 60 टक्के टॅक्स कापला जाऊ शकतो आणि उर्वरित रक्कम व्यापारी पियुष जैन यांना परत करता येईल. कारण, जे काही पैसे वसूल झाले आहेत, ते टॅक्स न भरता जमा केले आहेत. मात्र पीयूष जैन यांना हे सिद्ध करावे लागेल की त्यांनी केवळ टॅक्स न भरून इतका पैसा उभा केला आहे. म्हणजे सुमारे 155 कोटी रुपये वजा केल्यावर व्यावसायिकाला सुमारे 102 कोटी रुपये मिळतील.

जर उत्पन्न बेकायदेशीर असेल तर…
मात्र, आणखी एक परिस्थिती अशी उद्भवते की पीयूष जैन त्यांच्याकडे असलेला पैसा आणि दागिने किंवा इतर मालमत्ता, त्यांनी त्यांच्या व्यवसायातून कमावले आहेत आणि केवळ टॅक्स न भरूनच जमा केले आहेत, हे सिद्ध करू शकले नाही, तर त्यांच्यावर फौजदारी कलमांतर्गत कारवाई करण्यात येईल. अशा परिस्थितीत त्यांना पैसे परत मिळणार नाहीत. म्हणजे हा पैसा कोणत्याही बेकायदेशीर मार्गाने उभा केला असला तर संपूर्ण पैसा जप्त केला जाईल.

पियुष जैन कोण आहे ?
पियुष जैनचा जन्म कन्नौजमध्ये झाला, मात्र त्यांनी कानपूरमध्ये व्यवसाय सुरू केला. कनौजच्या जैन गल्लीत त्यांचे वडिलोपार्जित घर आहे, जे पूर्वी अगदी लहान होते. आता या घराचे आलिशान कॉटेजमध्ये रूपांतर झाले आहे. जैन रस्त्यावरील त्यांच्या शेजाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांनाही जैन कुटुंब इतके श्रीमंत असल्याची माहिती नव्हती. पियुष जैन यांचे वडील महेशचंद्र जैन हे व्यवसायाने केमिस्ट आहेत. महेशच्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले. महेश यांच्याकडूनच त्यांची मुले पियुष आणि अंबरीश यांनी परफ्यूम आणि खाद्यपदार्थांमध्ये वापरण्यासाठीचे सार कसे बनवायचे हे शिकले.

पियुष जैन यांचा व्यवसाय
पियुष जैन 40 हून अधिक कंपन्यांचे मालक आहेत. यातील दोन कंपन्या मिडल इस्टमध्ये आहेत. कन्नौजमध्ये पियुषचा परफ्यूम कारखाना, कोल्ड स्टोरेज आणि पेट्रोल पंप देखील आहे. पियुषचे मुंबईत मुख्य कार्यालय आहे. यासोबतच त्यांचा तेथे एक बंगलाही आहे. पियुष जैन परफ्यूमचा संपूर्ण व्यवसाय मुंबईतून करतात. परफ्यूमही मुंबईतूनच परदेशात पाठवले जाते.

Leave a Comment