हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोना विषाणूचे प्रमाण वाढत आहे. एकूण पॉझिटिव्ह केसेसचा आकडा साडेतीन हजारांपर्यंत पोहोचणार आहे. संसर्गामुळे मृत्यूची संख्या २००वर पोहोचली आहे. लॉकडाऊन देशभर सुरूच आहे. बर्याच जिल्ह्यांत संक्रमणाचे हॉटस्पॉट ओळखले गेले आहेत. हे हॉटस्पॉट्स काही दिवसांसती सील झाले आहेत. या व्यतिरिक्त काही भाग कंटेनमेट झोन म्हणून ओळखले गेले आहेत.
परंतु जेव्हा देश लॉकडाऊनमध्ये आहे, तेव्हा त्या भागांना सील करण्यात काय अर्थ आहे? आणि हे कंटेनमेट झोन काय आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी त्यांचा अर्थ समजला पाहिजे.
लॉकडाउन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात लॉकडाउनची घोषणा केली. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी हे लॉकडाउन लागू केले गेले. लॉकडाउनदरम्यान, लोकांना घरीच राहण्याची सूचना देण्यात आली आणि सर्व अनावश्यक क्रिया आणि सेवांवर बंदी घालण्यात आली. लॉकडाउन दरम्यान फक्त अत्याआवश्यक सेवा आणि सुविधा खुल्या ठेवण्यास परवानगी होती. यावेळी, लोक केवळ किराणा, भाजीपाला, औषध यासारख्या जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठीच बाहेर जाऊ शकत होते.
सीलिंग
देशव्यापी लॉकडाउननंतरही कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. बर्याच ठिकाणी संसर्ग होण्याचे प्रकार वाढले आहेत. हे लक्षात घेता, अनेक राज्य सरकारांनी काही जिल्ह्यांमध्ये हॉटस्पॉट्स ओळखली आहेत.
हे हॉटस्पॉट्स काही दिवसांसाठी सील केलेले आहेत. सीलबंद भागात लोकांना घर सोडण्यास नकार दिला गेला आहे. लोक जीवनावश्यक वस्तूंसाठी देखील घराबाहेर जाऊ शकत नाहीत.यावेळी अशा वस्तूंची होम डिलिव्हरी केली जाईल, असे प्रशासनाने म्हटले आहे.सीलबंद भागातील सर्व प्रकारच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. केवळ वैद्यकीय वाहनांना बाहेर जाण्यास परवानगी आहे. यावेळी काही प्रकारचे पास देखील काम करणार नाहीत. लोकांनी याचे उल्लंघन केल्याबद्दल प्रशासन कायदेशीर कारवाई करू शकते.
कंटेनमेंट झोन
कंटेनमेंट झोन हे असे क्षेत्र आहे जिथे कोरोना विषाणूची सकारात्मक प्रकरणे आढळली आहेत आणि तेथून अजूनही अधिकाधिक प्रकरणे बाहेर येऊ शकतात असे प्रशासनाला वाटते. अशा परिस्थितीत त्या भागाला सील केले जाते.एंट्री आणि एक्झिट पॉइंट स्थानांवर पोलिस तैनात असतात. तेथून लोकांना ये-जा करण्याची परवानगी नाही. याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. हे कंटेनमेंट झोन बिल्डिंग, हाउसिंग सोसायटी ते स्लम पॉकेट आणि हॉस्पिटल पर्यंत असू शकते.
सर्वात मोठा फरक म्हणजे कंटेनमेंट झोनचे तीन किलोमीटर पर्यंतचे क्षेत्र पूर्णपणे सील केलेले असते.येथे कोणतीही हालचाल होत नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”
या बातम्याही वाचा –
पृथ्वीवर आणखीन एक मोठे संकट, ओझोन थराला पडलेय मोठे छिद्र#HelloMaharashtrahttps://t.co/yT96JZZylX
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 10, 2020
भिलवाडा पॅटर्नच्या पाठीमागे 'या' तरुण महिला IAS अधिकाऱ्याचे डोके! जाणून घ्या काय आहे 'हा' पॅटर्न
@tinadabikhan या २०१५ च्या यु.पी.एस.सी. टाॅपर राहिल्या आहेत#BhilwaraModel #TinaDabi #Careernama #Career #Job #UPSC https://t.co/d9P8wbbHrx— Careernama (@careernama_com) April 10, 2020
रशियाची ग्लॅमरस टेनिसपटू शारापोव्हाने लॉकडाउनला कंटाळून शेअर केला थेट फोन नंबर@MariaSharapova #CoronavirusOutbreakindia #LockdownExtended #HelloMaharashtrahttps://t.co/gdlCkOPRbF
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 10, 2020
वाधवान कुंटुंबाच्या पाचगणी प्रवासाबाबत रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..@RRPSpeaks @RohitPawarSpeak @RohitPawarOffic #HelloMaharashtra #Mahabaleshwar https://t.co/o7BGs5fmsa
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 10, 2020
परदेशातून आल्यावर 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला स्वतःमध्ये आढळले कोरोनाची लक्षणे , नंतर…#HelloMaharashtrahttps://t.co/deXwWAsKL0
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 10, 2020
कडक उन्हाळा आपल्याला कोरोनापासून वाचवेल असं समजत असाल तर 'हे' वाचा#HelloMaharashtrahttps://t.co/gBUCk8CH5a
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 10, 2020
ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा – www.hellomaharashtra.in