हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून आपल्या ग्राहकांना चांगल्या बँकिंग सर्व्हिस देण्यासाठी नुकतेच एक नवीन सेवा सुरू करण्यात आली आहे. आता एसबीआयच्या ग्राहकांना घरबसल्या आपल्या खात्याशी संबंधित अनेक सेवा WhatsApp वरच मिळू शकतील.
यासाठी ग्राहकांना सर्वांत आधी SBI च्या WhatsApp बँकिंगसाठी रजिस्ट्रेशन करावे लागेल. यासाठी WAREG टाईप करा आणि स्पेस देऊन अकाउंट नंबर लिहून 7208933148 वर एसएमएस पाठवा. मात्र हा एसएमएस बँक खात्याशी लिंक केलेल्या नंबरवरूनच पाठवावा लागेल.
एसबीआयच्या WhatsApp बँकिंगसाठी रजिस्ट्रेशन केल्यानंतर, एसबीआयच्या 90226 90226 क्रमांकावरून WhatsApp नंबरवर ऑटोमॅटिकली मेसेज मिळेल. याशिवाय हा नंबर सेव्ह देखील करता येईल.
सेव्ह केल्यानंतर आता या नंबरवर Hi किंवा Hi SBI असे टाइप करून पाठवा. त्यावर बँकेकडून काही पर्याय पाठवले जातील. आपल्या गरजेनुसार पर्याय निवडून तो पाठवा. यानंतर बँकेकडून आपल्याला तोग्य ती माहिती दिली जाईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/personal-banking/digital/whatsapp-banking
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या आजचे नवीन व्याजदर
FD Rates : ‘या’ 2 बँकांनी FD वरील व्याजदरात केला बदल, जाणून घ्या नवीन व्याजदर
RBI ने लॉन्च केला Digital Rupee, जाणून घ्या कुठे खरेदी करता येईल ???
IDFC First Bank कडून एफडीवर मिळणार 7% पेक्षा जास्त व्याज, अशा प्रकारे करा गुंतवणूक
Financial Changes : आजपासून बदलले ‘हे’ 5 नियम, याचा आपल्यावर कसा परिणाम होईल ते पहा